#World Cancer day :-स्तनांचा कर्करोग

गेल्या काही वर्षात स्तनांचा कर्करोग हा तरुण वयातच होण्याचं प्रमाण अधिक वाढलेलं दिसतंय. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. पूर्वीपेक्षा हे प्रमाण अधिक वाढलं आहे. अलीकडे याकडे लक्ष केंद्रित केल्याने काही रुग्ण प्रगतिपथावर आहेत. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 


कारण हा कर्करोग बरा होण्याची शक्यता असते. यासाठी नियमित एक तास स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वयाच्या २० वर्षीपासूनच योग्य डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. जेणेकरून या कर्करोगाचं निदान लवकर होण्यास मदत होईल आणि वेळीच उपचार केल्याने एखादीला नव्याने जीवनाची संधी मिळू शकते. जगभरातील महिलांचं मृत्यू होण्याचं प्रमुख कारण स्तनांचा कर्करोग हे आहे. 

नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की दर अठ्ठावीस महिलांमधील एका महिलेला स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. भारतात स्तनांचा कर्करोग ४३ ते ४६ या वयादरम्यान होतो. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये अधिकाधिक जागरूकता कशी निर्माण होईल, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
थोडे नवीन जरा जुने