तोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.

तुम्हाला जेवण जात नाही? किंवा जेवण करण्याची इच्छा होत नाही? तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांच्या स्वाद ग्रंथी चांगल्यारीतीने काम करीत नाहीत किंवा ज्यांची गंध घेण्याची क्षमता कमकुवत असते त्यांनासुद्धा ही समस्या उद्भवते. 


तसेच दीर्घ काळ आजारी असल्याने आणि औषधांचे अधिक सेवन केल्यानेसुद्धा असे होते. याशिवाय व्यक्तीच्या तोंडाची चव जाण्याची इतरही अनेक कारणे आहेत. काही अशीच कारणे आणि त्यावरील उपायांबाबत जाणून घेऊया..

• नेहमी भूक लागल्यावरच जेवण केल्यास तोंडाला चव येते. बळजबरीने, इमोशनल इटिंग किंवा इच्छा नसताना केलेले जेवण कधीच अंगी लागत नाही.
• जेवणात नेहमी वेगवेगळ्या व्हरायटीज ठेवण्याचा प्रयत्न करावा. एकाच प्रकारचे जेवण केल्याने अमुक खाद्य पदार्थ खावेसे वाटत नाहीत. तसेच दररोज काहीतरी नवीन असल्याने चव कायम राहते आणि हे खाद्य पदार्थ खाण्यासाठी तुम्ही प्रेरित व्हाल.
• धूम्रपानासारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे. तज्ज्ञांच्या मते धूम्रपान केल्याने स्वाद ग्रंथींची कार्यप्रणाली बाधित होते आणि जेवण करताना तोंडाला चव येत नाही.
• कधीही घाईघाईत किंवा टीव्ही पाहताना जेवण करू नये. तसेच अन्न चावून-चावून खावे, कारण जेव्हा अन्नाचे कण लाळेत मिसळतात, तेव्हाच चव येते.
• वॉकिंग किंवा जॉगिंगही केले पाहिजे. एका संशोधनानुसार जे लोक नियमितपणे हे व्यायाम करतात त्यांची गंध घेण्याची क्षमता चांगली राहते.
• जेवणात सर्व रंगांचा समावेश करण्याचा प्रयत्न करावा. रंग व्यक्तीला आकर्षित करतात आणि आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा फायदेशीर असतात. सर्व प्रकारच्या रंगांची फळे, भाज्यांचे भरपूर सेवन करावे.
• जेवणात एखाद्यावेळी मसाल्यांचा वापर केला पाहिजे. यामुळे जेवणाचा सुगंध वाढेल आणि खाण्याचीही तीव्र इच्छा होईल.
• पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट पाहू नये. कारण जीभ कोरडी पडल्यानेसुद्धा जेवताना तोंडाला चव राहात नाही. लागोपाठ एक-दोन घोट पाणी पीत राहावे.
थोडे नवीन जरा जुने