घरफोडी त एक लाखांचा मुद्देमाल लंपास


नागपूर : घरी कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोराने घराच्या मुख्यदाराचा कडी आणि कोयंडा तोडून कपाटातील १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर हद्दीतील प्लॉट नं. २१ मामा ले-आउट, झिंगाबाई टाकळी, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी शुभांगी ऊर्फ शांता यादवराव गावंडे (४७) या १० ते १२ मार्चदरम्यान घराला कुलूप लाऊन नवीन शुक्रवारी, महाल, नागपूर येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या. 


यादरम्यान, अज्ञात चोराने घरी कुणीही नसल्याची संधी साधून त्यांच्या घराच्या मुख्यदाराचा कडी आणि कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील आलमारीमधील सोन्या, चांदीचे दागिने व नगदी ६ हजार रुपये, असा एकूण १ लाख ५ हजार ३०० रुपयांचा मुद्येमाल चोरून नेला. दोन दिवसांनंतर घरी परतल्यावर फिर्यादीला घरी चोरी झाल्याचे लक्षात आले.
थोडे नवीन जरा जुने