पालक या भयानक रोगावर करेल मात, वाचा कसे कराल सेवन...


पालक एक पालेभाजी असून औषधी गुणांमुळे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. बाराही महिने पालकाचे उत्पन्न संपूर्ण भारतातून घेतले जाते. पालकचे शास्त्रीय नाव स्पिनॅसिया ओलेरोसिया असे आहे. पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन व लोह असते. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड असते.
पालकाच्या पानांचा रस आणि नारळ पाणी एकसमान मात्रामध्ये मिसळून पिल्यास मुतखडा (किडनी स्टोन) लघविद्वारे शरीराबाहेर निघून जातो.

कावीळ झालेल्या व्यक्तीला पालकाचा रस कच्च्या पपईमध्ये मिसळून खायला दिल्यास त्या व्यक्तीला आराम मिळेल. डाँग - गुजरातमधील आदिवासी लोक कावीळ झालेल्या व्यक्तीला मुगाच्या डाळीमध्ये पालक टाकून तयार केलेली भाजी खाण्यासाठी देतात.

रक्तदाब (ब्लड प्रेशर) आजार असणाऱ्या लोकांनी पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते.

गुजरातमधील डाँग आदिवासी जमातीनुसार काकडी, पालक आणि गाजराचे एकसमान मात्रामध्ये ज्यूस तयार करून पिल्यास केस वाढण्यास मदत होते.

थायरॉइडचा आजार असलेल्या लोकांनी एक ग्लास पालकाच्या रसामध्ये एक चमचा मध आणि एक चतुर्थांश जिर्याची पूड टाकून या रसाचे सेवन केल्यास लाभ होईल.

थोडे नवीन जरा जुने