पैशाच्या देवाणघेवाणीतून हाणामारी; तरुण जखमी


नागपूर : पैशाच्या देवाणघेवाणीतून झालेल्या हाणामारीत ४ आरोपींनी केलेल्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. यावेळी आरोपींनी त्याच्याजवळील मोबाइल व रोख १६ हजार रुपये व एक १५ हजारांची सोनसाखळी, असा एकूण ४१ हजारांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून पोबारा केला. फिर्यादी आशिष सुरेशराव गायकी (३१, रा. अयोध्यानगर, नागपूर) हा एनडीपीएसची खबर काढण्याकरिता गुप्त बातमीदार म्हणून आरोपी मधू अग्रवालकडे ११ मार्च रोजी दुपारी ११ ते १२.३० वाजताच्या सुमारास गेला होता. आरोपीकडून त्यांचा २ लाख रुपयांत सौदा झाला. परंतु, त्यामध्ये ४० हजार रुपये कमी असल्याने साक्षीदार राहुल हा फिर्यादीच्या म्हणण्यानुसार पैसे आणण्याकरिता बाहेर गेला. 


यादरम्यान, आरोपी मधू अग्रवालने फिर्यादीला नंदनवन हद्दीतील वाठोडासमोरील कोहिनूर लॉनसमोरील एका कॉम्प्लेक्सच्या ऑफिसची चावी आणण्यासाठी सोबत चलण्यास म्हटले. दोघेही सोबत निघाले असता, आरोपीने फोन करून त्याच्या २ ते ३ मित्रांना बोलावून घेतले. काही वेळानंतर ते त्याठिकाणी आल्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून लाकडी दांड्याने फिर्यादीच्या दोन्ही हात व पायावर मारून गंभीर जखमी केले. तसेच त्यातील एकाने चाकूने फिर्यादीच्या पायावर मारले. 

आरोपी मधू अग्रवालनेही त्याच्याजवळील पिस्तूलच्या मुठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारून जखमी केले. त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीजवळील एक मोबाइल व रोख १६ हजार रुपये, एक १५ हजारांची सोनसाखळी चेन, असा एकूण ४१ हजारांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून पळून गेले.
थोडे नवीन जरा जुने