परीक्षेच्या काळात या पद्धतीने राहा तणावापासून दूर......
आपल्या दिवसाची सुरुवात संतुलित आणि स्वस्थ नाष्टा घेऊन करा. कधीही नाष्टा करणे टाळू नका. नाष्ट्याबरोबर दोन-तीन प्रकारची फळ परीक्षा येताच विद्यार्थ्यांचा तणाव वाढतो. या तणावातच मग ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात व लगेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या कमजोर होतात. अशा वेळी आपला ताण दूर करण्यासाठी पुढील उपाय करा...

नाष्टा अवश्य करा
आपल्या दिवसाची सुरुवात संतुलित आणि स्वस्थ नाष्टा घेऊन करा. कधीही नाष्टा करणे टाळू नका. नाष्ट्याबरोबर दोन-तीन प्रकारची फळे खाऊ शकता. केवळ दुधावरच निर्भर राहू नका, कारण ते यासाठी पूर्णान्न नाही. जास्त दूध प्यायल्यास अपचनाची समस्याही होऊ शकते.

पाणी खूप प्या
स्वत:बरोबर पाण्याची एक बाटली नक्की ठेवा. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता राहणार नाही व अपचनाशी संबंधित समस्याही होणार नाहीत. पुरेसे पाणी हे कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करण्यास उपयुक्त ठरू शकते. स्वस्थ राहण्यासाठी अधिक कॅलरी असलेले आणि कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवनही सीमित करा.

जंक फूड कमी करा
अनेक विद्यार्थी परीक्षेच्या काळात ऑनलाइन ऑर्डर करून काही मिनिटांतच पिझ्झा किंवा बर्गरसारखे पदार्थ मागवतात. जर तुम्ही दिवसभर अभ्यास करत आहात आणि त्यात हे जंक फूड खात असाल तर त्याने जास्त कॅलरी शरीरात जाऊन लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळेच परीक्षेच्या काळात फास्ट फूड टाळा.

झोप पूर्ण घ्या
आपली एकाग्रता कायम राहावी म्हणून या काळात झोप पूर्ण घेतलीच पाहिजे. रात्रीची आठ तासांची झोप तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. जर दिवसा तुम्हाला वेळ मिळाला तर अर्ध्या तासाची वामकुक्षीही अवश्य घ्या. याने तुमचे शरीर ताजेतवाने होईल. जर तुम्ही झोप कमी घेतली तर या काळात चिडचिडेपणा वाढू शकतो. त्याने एकाग्रताही कमी होऊ शकते.

झोप येऊ नये म्हणून वारंवार चहा-कॉफी पिऊ नका. कारण यामुळे अॅसिडिटी व अपचन होऊ शकते. जर खूप झोप येत असेल तर सरळ झोपी जा.

परीक्षेच्या काळात काही समस्या असतील तर आपल्या पालकांना किंवा मित्रांना त्या जरूर सांगा. योग्य सल्ला व दिशा मिळू शकते व तुमचा तणाव दूर होऊ शकतो.
थोडे नवीन जरा जुने