सॅमसंगचा 'ए-७०' स्मार्टफाेन लवकरच बाजारात


नवी दिल्ली: दक्षिण काेरियातील आघाडीची सॅमसंग कंपनी पुढील वर्षात 'ए ७०' स्मार्टफाेन भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. मे महिन्यात 'ए ८०' स्मार्टफाेन बाजारात येणार आहे.

'ए ७०' ची किंमत २५ ते ३० हजार रुपये आणि 'ए ८०'ची किंमत ४५ ते ५० हजार रुपयांच्या दरम्यान असेल, अशी माहिती सॅमसंग इंडियाचे सीएमअाे आणि वरिष्ठ उपाध्यक्ष रणजित सिंह यांनी दिली. अलीकडेच सॅमसंगला भारतीय बाजारपेठेत स्मार्टफाेन कंपन्यांकडून आव्हान मिळत आहे.

 बजेट आणि मिड सेगमेंटमधील स्मार्टफाेनमध्ये हे आव्हान जास्त आहे. या आव्हानाला ताेंड देण्यासाठी सॅमसंग 'ए' मालिकेतील स्मार्टफाेनवर जास्त लक्ष देत आहे. 'ए' मालिकेतील फाेन १० ते ५० हजार रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहेत. रणजित सिंह म्हणाले की, ए मालिकेतील फाेन सादर करून भारतीय बाजारपेठेत आम्ही ४०० काेटी डाॅलरच्या (सुमारे २७ हजार कोटी रुपये.) महसुलाचे लक्ष्य ठेवले आहे. 

एक मार्चपासून ४० दिवसांमध्ये 'ए ५०', 'ए ३०' आणि 'ए १०' माॅडेलच्या माध्यमातून ५० काेटी डाॅलरचा (सुमारे ३.७ हजार काेटी रुपये) महसूल प्राप्तदेखील केला आहे. त्यामुळे 'ए' मालिकेची पूर्ण माेबाइलची श्रेणी बाजारात आल्यानंतर वार्षिक लक्ष्यदेखील पूर्ण करू शकू.
थोडे नवीन जरा जुने