गवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...



लहानपणी अनेकवेळा गवारीची भाजी न खाल्ल्यामुळे आईचा ओरडा ऐकावा लागत होता. आता जेव्हा या भाजीमधील गुणांवर होत असलेल्या आधुनिक शोधाची माहिती ऐकल्यानंतर लक्षात येते की, आईचा तो ओरडा का होता. 

घराघरात खाल्ल्या जाणार्या गवारीची शेती भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये केली जाते. या भाजीमध्ये भरपूर औषधी गुण सामावलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला या भाजीचे खास फायदे आणि उपाय सांगत आहोत.

गवारीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स व्हिटॅमिन K, C, A भरपूर प्रमाणात आढळून येतात. या व्यतिरिक्त यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम आढळून येते. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा वसा आढळून येत नाही. गवारीला जबरदस्त टॉनिक मानले जाते.

गवारीचे खास फायदे - 

डायबिटीज रुग्णांसाठी लाभदायक


गवारीमध्ये आढळून येणारे ग्लायको न्युट्रिएन्ट्स डायबिटीज रुग्णांसाठी एखाद्या वरदानाप्रमाणे आहेत. याचे डायट फायबर्स अन्न पचन करण्यात मदत करतात. डायबिटीज रुग्णांनी कच्ची गवार खाल्ल्यास लवकर लाभ होतो.

या भाजीमध्ये आढळून येणारे कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम हडांच्या मजबुतीसाठी सहायक ठरतात. शारीरिक स्वरुपात कमजोर व्यक्तीने गवारीचे दररोज सेवन करावे.


हृदयासाठी फायदेशीर

गवारीची अर्धीकच्ची भाजी आरोग्यासाठी सहायक मानली जाते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार, ही भाजी हृदय रुग्णांसाठी उत्तम आहे. आधुनिक विज्ञानानेसुद्धा गवारीमध्ये आढळून येणाऱ्या फायबरला कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवण्यासाठी उत्तम मानले आहे.

गुजरातमधील डाँग भागातील आदिवासी गवार वाळवून याची पावडर तयार करतात आणि टोमॅटोबरोबर चटणी स्वरुपात खातात. डायबिटीजच्या रुग्णाला 80 दिवस कमीतकमी दोन वेळेस ही चटणी दिल्यास लाभ होतो.


दमा असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर

गवारीला पाण्यामध्ये उकळून याचा रस दमा असलेल्या रुग्णाला दिल्यास लाभ होतो. आदिवासी लोक दमा रुग्णांना गवारीच्या शेंगा कच्च्या खाण्याचा सल्ला देतात.

पातळकोट येथील आदिवासी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गवारीच्या शेंगामधील बिया रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवून दुसर्या दिवशी या बिया बारीक करून सूज, सांधेदुखी, भाजलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम मिळतो.


डाग, खाज यामध्ये उपयुक्त

गवारीच्या पानांचा चार चमचे रस आणि लसणाच्या 3-4 कुड्यांचा रस एकत्र करून हे मिश्रण डाग, खाज असलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळेल.

कच्ची गवार बारीक करून यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबिर टाकून चटणी तयार करून घ्यावी. दररोज या चटणीचे सेवन केल्यास डोळ्यांची शक्ती वाढते.
थोडे नवीन जरा जुने