वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? 'ह्या' टिप्स ने फेंगशुईच्या मदतीने वजन कमी कराल


वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? कामाच्या धावपळीत वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नसेल आणि तुम्ही डाइटिंग करण्यासही इच्छुक नसाल. अशा स्थितीमध्ये तुम्ही फेंगशुईचे काही खास उपाय करू शकता. 

कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु चीनी वास्तुशास्त्रामध्ये काही असे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता. फेंगशुई एनर्जीचा प्रवाह योग्य असेल तर तुम्ही एकदम फिट राहाल.

स्वयंपाकघराच्या सजावटीवर द्या भर - 

स्वयंपाकघर घरातील सर्वात महत्त्वाची जागा असते. यामुळे स्वयंपाकघराच्या साफ-सफाई, स्वच्छतेसोबतच सजावटीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. स्वयंपाकघरातील सर्व अनावश्यक वस्तू काढून टाका. भिंतींवर फिकट रंगाचा वापर करा. फेंगशुई शास्त्रानुसार गडद रंग भूक वाढवतात आणि फिकट रंग भूक कमी करतात. याचबरोबर काळ्या, निळ्या रंगाच्या प्लेट्स आणि टेबल क्लोथचा उपयोग करावा. यामुळे तुम्ही आहार कमी घ्याल आणि तुमचे वजन नियंत्रणात राहील.

जेवण पाहून तुटून पडू नका - 

अनेकवेळा आपण जेवण पाहताच त्यावर तुटून पडतो, परंतु हे योग्य नाही. फेंगशुई शास्त्रानुसार जेवण करण्यापूर्वी संतुष्टीची इच्छा करावी. यामुळे जेवण स्वास्थ्यवर्धक राहते तसेच यामुळे कोणताही विकार उत्पन्न होत नाही.. जर तुम्हाला जास्त खाण्यापासून दूर राहण्याची इच्छा असेल तर किचन आणि डायनिंग टेबलवर ताजी फळं सजवून ठेवा. भारतीय संस्कृतीमध्येही जेवण करण्यापूर्वी देवाचे नाम स्मरण करण्याचा सल्ला दिला गेला आहे.


आरशाच्या मदतीने कमी करा वजन - 

सूर्याचा प्रकाश सरळ किचन किंवा डायनिंग भागामध्ये येईल अशी व्यवस्था करावी. या व्यतिरिक्त फेंगशुई शास्त्रानुसार तुम्ही डायनिंग टेबल किंवा फ्रीजसमोर आरसा लावून तुमचे वजन कमी करू शकता. फेंगशुई मान्यतेनुसार यामुळे आहार पोषक आणि आरोग्यवर्धक होतो आणि तुमच्या शरीराची कार्यप्रणाली एकदम व्यवस्थित चालते.


शूज पाहून वजन कमी करा - 

वाचायला आणि ऐकायला थोडेसे विचित्र वाटेल परंतु बुटांकडे पाहूनही वजन कमी केले जाऊ शकते. तुमचे बूट तुम्हाला येत-जात दिसतील अशा ठिकाणी ठेवा. या गोष्टीकडे विशेष लक्ध द्या की, बूट स्वच्छ, साफ केलेला आणि नवीन असावा. घरामध्ये स्वस्थ आणि प्रसन्न लोकांचे फोटो लावावेत. या गोष्टींचाही तुमच्या शरीरावर चांगला प्रभाव पडेल.


बेडरूममध्ये सामान अस्ताव्यस्त टाकू नका - 

बेडरूम नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असावी. विशेषतः कपाटात कपडे कोंबून ठेवू नका. घरातील आणि बेडरूममधील अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू व्यवस्थित जागेवर ठेवा. या सर्व नियमांचे पालन केल्यास फेंगशुई एनर्जीचा प्रभाव तुमच्यासाठी लाभकारी राहील.
थोडे नवीन जरा जुने