पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करण्यास सरकारने वाढवली मुदतवाढ !


नवी दिल्ली : पॅनकार्ड-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने मार्च २०२० पर्यंत वाढवली आहे. लिंक करण्याची मुदत ३१ डिसेंबर , २०१९ रोजी संपुष्टात येत होती. 

मात्र पुन्हा एकदा सरकारेन मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आणखी तीन महिने आधार व पॅनकार्ड करण्याचा अवधी मिळाला आहे. आयकर कायदा १९६१ मधील तरतूद १३९अ नुसार, तुमचे पॅनकार्ड हे आधार कार्डशी लिंक असायला हवे. 

यासाठीची मुदत आता ३१ डिसेंबर २०१९ वरून ३१ मार्च २०२० करण्यात आल्याची माहिती उइऊळ (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे. केंद्र सरकारने आठव्यांदा पॅन व आधारकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निर्णय दिला होता की आधार हे आता आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅनकार्ड मिळण्यासाठी बंधनकारक असेल. १ जुलै २०१७ पासून पॅनकार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळण्याचा अधिकार आहे.
थोडे नवीन जरा जुने