हॉटेल, लॉजवर मुली पुरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश


मुंबई : जुहू पोलिसांनी पश्चिम उपनगरात चालणाऱ्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी योगेश गेहलोत आणि सूरजकुमार मंडल दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. 

या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून या तरुणींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अंधेरी आणि जुहू येथील काही हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार, मुली पुरवणारी एक टोळी कार्यरत आहे. 

ही टोळी अशा प्रकारे सेक्स रॅकेट चालवून तरुणींच्या मदतीने मोठा मोबदला मिळवून त्यातील काही हिस्सा या तरुणींना देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी एक बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा केली होती.

 या ग्राहकाने काही तरुणींना घेऊन दलालास जुहू येथील आयरीश पार्कसमोरील देवळे रोडवरच्या एका हॉटेलमध्ये बोलावले होते. तिथे योगेश गेहलोत आणि सूरजकुमार मंडल हे तीन तरुणींना घेऊन आले होते.
थोडे नवीन जरा जुने