रोजच्या चहात 'हे' छोटेसे बदल केले तर, आजारीही पडणार नाही, नेहमी चिरतरूणही राहाल !
चहाचा पहिल्यांदा एक औषधी म्हणून वापर करण्यात आला हे खूप कमी लोकांना माहिती असावे. जडी-बुटींची माहिती असणारे लोक चहाच्या पानांचा आणि बियांचा औषधी म्हणून वापर करतात. काळाप्रमाने चहाचे महत्व वाढत गेले आणि आज आपल्या दिवसाची सुरवातच चहाच्या कपाने होते.

औषधी पेय आणि पदार्थांचा आपल्या आहरात योग्य प्रमाणात वापर केल्यास कुठल्याच आजार होत नाही. योग्य प्रमाणात चहा पिल्याने रोग तुमच्या आसपासही येणार नाहीत. आज चहाचे असेच औषधीगुण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गवती चहा

बुंदेलखडातील आदिवासी लोक या प्रकारची चहा पितात. लिंबाचा वास आसणा-या या चहाच्या घोटाने तुम्हाला ताजे-तवाणे वाटेल. गवती चहाची दोन-तिन पाने चुरगळून, दोन कप पाण्यात उकळले जातात.चविनुसार साखर घालून याला एक कप होईपर्यंत उकळले जाते. आदरक आवडत आसल्यास तुम्ही यात थोडेसे आदरकही टाकू शकता. गवती चहामध्ये दूधाचा वापर होत नाही. गवती चहामध्ये अंटीओक्सीडंट गुण आसल्याने, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.


काळी चहा

खुप गोड आसणा-या या चहात दूध नसते. दोन कप पाण्यात एक चमचा चहाची पत्ती आणि तिन चमचे साखर टाकून हे मिश्रण एक कप होईपर्यंत याला उकळा. यानंतर गाळून प्या. हर्बल तज्ञांनाच्या मते, ही गोड चहा मेंदूला तरतरीत ठेवते आणि तणाव कमी करते.


धन्याची चहा-

तबेत चांगली राहण्यासाठी राजस्थानमध्ये धन्याची चहा पितात. दोन कप पाण्यात थोडे जिरे, धने, चहापत्ती आणि सोफ एकत्र करून हे मिश्रण दोन मिनीटे ढवळा. चविनुसार यात साखर घाला. यात तुम्ही मध टाकूनही पिऊ शकता. गळ्याचे आजार, अपचन, गॅसचा त्रास असणा-या लोकांनी ही चहा पिल्यास फायदा होतो.


अनंतमुली चहा

पातळकोटमधील आदिवासी हिवाळ्यात अनंतमुलीची चहा पितात. अनंतमुली हे एक गरमी निर्माण करणारे झाड आहे. अनंतमुलीची मुळे घेऊन ती एक ग्रॅम सोफ सोबत पाण्यात एकत्र करतात. यात थोडी चहाची पत्ती टाकून हे मिश्रण ढवळतात. दमा आणि खोकल्याचा त्रास असणा-या लोकांना हा चहा प्यायला देतात.


आंबट गवती चहा

मध्यभारतातील गोंडवान क्षेत्रात गवती चहामध्ये लिंबू किंवा संतर-याची साल आणि काही थेंब लिंबाचा रस टाकून ही गवती चहा पितात. आदी काळापासून या अंटी येजनींग उपायाचा आदिवासी वापर करतात. आजचे आधूनिक विज्ञानही या गोष्टीला पुष्टी देते. एका संशोधनानूसार गवती चहात लिंबू टाकून पिल्याने वय वाढण्याची प्रकिया मंदावते आणि तुम्ही चिरतरूण राहता.


मुलेठी चाह-

गुजरातराज्यातील सौराष्टरात जेठीमध नावाने ओळखला जाणा-या चहाला मध्यभारतात मुलेठी म्हणतात. साधी चहा बनवताना त्यात चुटकीभर मुलेठी टाकून पिल्याने सुगंध तर दरवळतोच पण त्याच बरोबर चवही चांगली लागते. दमा आणि सर्दिचा त्रास असणा-यानी रोज दोन किंवा तिन वेळा ही चहा पिल्याने फायदा होतो.


मधाचा चहा-

यात मध आसल्याने याला शहदी चाय किंवा सैदी चहा असेही म्हणतात. बस्तर मधील आदिवासी गावात हा चहा बनवतात. दोन चमचे चहापत्ती, दोन चमचे मध आणि थोडेसे दूध एकत्र करून हे मिश्रण घोटले जाते. एक कप उकळत्या पाण्यात ते मिश्रण टाकले जाते.यात आदरक टाकले की तयार होईल तुमची मधाची सैदी चहा. या चहाने उत्साह वाढतो. मध, चहा, आणि आदरक यांना स्वताचे औषधी गुण आहेत. हे तिन्ही औषधी पदार्थ एकत्र आसल्याने हे एक टॉनिक बनते.


मसाला चहा

गुजरात राज्यात काळे मिरे, सुंठ, तुळस, दालचिनी, इलाईची, लौंग, जायफळ, एकत्र करून याचा एक मसाला बनवल्या जातो. चहाची पत्ती आणि दूध उकळून त्यात हे चिमुटभर हा मसाला टाकला की मसाला चहा तयार होतो. ही सुगंधी चहा ताजगी वाढवते.
थोडे नवीन जरा जुने