४ दिग्गज नेते असूनही पहिल्यांदाच 'या' जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान नाही !


सोलापूर : इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मागील चाळीस वर्षांच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात कायम मानाचे स्थान असायचे. 

मात्र यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला वगळण्यात आल्याने ताई, नाना, दादा, बापू, सर यांच्या समर्थकांतून अस्वस्थता व्यक्त होत आहे.

काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार व त्या सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री होणार, अशी पोस्ट सामाजिक माध्यमातून मागील दोन दिवसापासून फिरत होती. 

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही आ. प्रणिती शिंदे यांच्या मंत्रिमंडळ समावेशासंदर्भात दुजोरा दिला होता. झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आ. प्रणिती शिंदे या शपथ घेणार याची खात्री बाळगून त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई गाठली होती. 

मात्र आ. प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. 

तसेच  ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश होणार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. भारत भालके, आ. बबनराव शिंदे, काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे तर शिवसेनेचे भूम­परंडाचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी प्रा.डॉ. तानाजी सावंत यांची नावे आघाडीवर होती. मात्र सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नसल्याने सर्वांचाच भ्रमनिरास झाला.
थोडे नवीन जरा जुने