कच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल ?इंग्रजी भाषेत भेंडीला लेडीज फिंगर म्हटले जाते. भेंडीचे वानस्पतीक नाव अबेलमोशस एस्कुलेंटस असे आहे. भेंडी एक फळभाजी असून शेतामध्ये तसेच घराच्या बागेत या भाजीचे उत्पन्न घेतले जाते. 


सामान्यतः लोक भेंडीकडे फक्त भाजीच्या स्वरुपात बघतात, मात्र आदिवासी भागात भेंडीचा उपयोग अनेक आजारांवरील उपचारासाठी केला जातो. आज आम्ही तुम्हाला भेंडी खाण्याचे काही खास फायदे सांगत आहोत. ज्या लोकांना वजन कमी करण्याची इच्छा असेल त्यांनी सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खावी. 

सकाळ-संध्याकाळ कच्ची भेंडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांसोबतच व्हिटॅमिन ए,बी,सी, ई व के आणि कॅल्शिअम, लोह, जस्त इत्यादींचे प्रमाण असते. याशिवाय भेंडीमध्ये जास्त प्रमाणात लसदार फायबरसुध्दा आढळते.

भेंडीची अत्यंत फायदेशीर, महत्त्वाची माहिती सांगत आहेत डॉ. दीपक आचार्य (संचालक, अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद). डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून भारतातील दूरवर पसरलेल्या आदिवासी गावांतील उदा. पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरवली (राजस्थान) आदीवासींच्या पारंपरिक ज्ञानाला एकत्र करून त्याला आधुनिक विज्ञानच्या साह्याने प्रमाणित करण्याचे कार्य करत आहेत.

मध्यप्रदेशमधील पाताळकोट येथील हर्बल उत्पादनाचे जाणकार भुमका हे नपुंसकता दूर करण्यासाठी पुरुषांना कच्ची भेंडी चावून खाण्याचा सल्ला देतात. येथील आदिवासी शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी भेंडीचा वापर करतात.

आदिवासी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ  चावून खाल्ल्यास वीर्य आणि शुक्राणूमध्ये वृद्धी होते.


पाच कापलेल्या भेंड्यामध्ये लिंबाचा सर (अर्धा चमचा) डाळींब आणि आवळ्याची पान (5-5 ग्रॅम)इ. रात्रभर 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी या सामग्रीचे चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करून घ्या. दररोज दोन वेळा सलग सात दिवस याचे सेवन करावे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपचाराने कावीळसारखा आजार एका आठवड्यात ठीक होतो. ताप आणि सर्दी-खोकल्यावरही हा एक चांगला रामबाण उपाय आहे.


मधुमेहाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी भेंडीची अर्ध शिजलेली भाजी खाणे आवश्यक आहे. डांग-गुजरात च्या हर्बल तज्ज्ञांच्या मते ताजी हिरवी भेंडी डायबेटीज रुग्णांसाठी खुपच फायदेशीर आहे.


डाँग- गुजरात राज्यातील आदिवासी भेंडीचा काढा तयार करून सिफि़लिस (एक यौनसंचारित रोग, जो ट्रिपोनीमा पैलीडियम नावाच्या जिवाणूमुळे होतो) आजार असेलेल्या व्यक्तीला दिला जातो. ५० ग्रॅम भेंडी बारीक कापून २०० मि.ली. पाण्यामध्ये उकळून घेतली जाते. जेव्हा हे पाणी उकळून अर्धे शिल्लक राहते तेव्हा आजारी व्यक्तीला पिण्यासाठी दिले जाते.एक महिना हा काढा नियमित घेतल्यास आराम मिळतो.


काही भागांमध्ये भेंडीच्या कापलेल्या देठांना पीण्याच्या पाण्यात रात्रभर भिजवून ठेवण्यात येते. सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी हे पाणी प्यायले जाते. त्यानंतर उरलेल्या या भेंडीच्या देठांना फेकून द्यावे. मधूमेहावर नियंत्रण मिळवण्याचा हा एक चांगला उपाय आहे.


भेंडीच्या बीयांना एकत्रित करून घ्यावे. त्यानतंर त्यांना उन्हात वाळवावे. वाळल्यानंतर बीया बारीक कुटून घ्यावे. या बीयांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते आणि उत्तम शरिरासाठी हे उपयुक्त ठरते. हे चुर्ण लहान मुलांना खाऊ घातल्याने ते एका टॉनिकप्रमाणे काम करते.


भेंडीच्या बीयांचे चूर्ण (5 ग्रॅम), विलायची (5 ग्रॅम), दालचीनीच्या सालीचे चूर्ण (3 ग्रॅम) आणि काळी मिर्ची(5 दाणे) या सर्वांना एकत्र बारीक करून घ्या. या मिश्रणाला रोज दिवसातून 3 वेळा कोमट पाण्यात टाकून प्यावे. याचा मधूमेहाच्या रुग्णांना चांगला फायदा होतो.
थोडे नवीन जरा जुने