आठवड्यातून एक दिवस उपवास का करावा ?सर्वच धर्मांमध्ये उपवासाची आवश्यकता सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परंपरेप्रमाणे उपवास किंवा व्रत करतच असतो. 


उपवासाचा संबंध आपल्या मानसिक आणि शारीरिक शुद्धीकरणाशी आहे. हे महत्त्व ध्यानात घेऊनच अनेक धर्मांनी उपवासाची योजना केलेली असावी.

वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही आठवड्यातून एकदा उपवास करणे आवश्यक आहे. प्रत्येक आजारावार उपवास हाच उपाय आहे असे नाही, परंतु अधिकांश आजारांवर उपवास रामबाण आहे.

उपवासाचे अनेक फायदे आहेत. उपवासाने शरीराला ऊर्जा मिळते. उपवास केल्याने श्वास-उच्छवास यावरही चांगला परिणाम होतो. 

स्वाद ग्रहण करणा-या ग्रंथी सक्रीय होतात. उपवासाने आत्मविश्वास वाढायला मदत होते. उपवासामुळे मेटॅबॉलिझम सामान्य स्तरावर येते. 

ऊतींना प्राणवायू मिळणारी प्रणाली सक्रीय होते. उपवासाने आध्यात्मिक शक्ती वाढते. ज्ञान, विचार, पवित्रता आणि बुद्धीचा विकास होतो. 

आठवड्यातून एक दिवस निराहार राहिल्याने, एक वेळ भोजन केल्याने किंवा फलाहाराने पचनव्यवस्थेला विश्रांती मिळते. पचनसंस्था चांगली राहिल्याने अनेक आजार आपोआप दूर होतात.
थोडे नवीन जरा जुने