सतत आजारी पडते म्हणून, आईच्या डोक्यात लोखंडी सळईचा फटका मारून संपवले !बोईसर : सतत आजारी पडणे आईच्या जीवावर बेतले असून, पोटच्या मुलानेच आपल्या आईच्या डोक्यात लोखंडी सळईचा फटका मारून तिची हत्या केल्याचे येथील बीएआरसी कॉलनीत घडली. चंद्रावती धोबी (६२) असे या दुर्दैवी मातेचे नाव असून, तिची हत्या करणाऱ्याचे नाव जयप्रकाश असे आहे. 

गेल्या काही वर्षापासून चंद्रावती यांना मोतिबिंदू, मधुमेह, गुडघेदुखी अशा आजारांचा त्रास होता. त्या बीएआरसी कॉलनीत राहणाऱ्या मुलीकडे राहत होत्या. 

त्यांची मुलगी रविवारी प्रशिक्षणासाठी बाहेर गेली असता जयप्रकाश तिच्या घरी आला होता. दरम्यान, चंद्रावती स्वयंपाकघरात काम करत असताना जयप्रकाशने त्यांच्या डोक्यात सळईचा प्रहार केला. 

त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी जयप्रकाश याला अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
थोडे नवीन जरा जुने