केसात कोंडा झाला असेल तर, हा साधा-सोपा उपाय करा आणि फरक पहा !


डँड्रफ किंवा डोक्यातील कोंड्याने अनेकजण त्रस्त असतात. त्वचेतील मृत पेशींपासून कोंडा तयार होतो. वातविकारामुळेही कोंडा तयार होतो. कोंड्यामुळे डोक्यात खाज सुटते आणि केसही गळतात. 

शँपू, तेल आदीने कोंडा पूर्णपणे दूर होत नाही. शँपूचा वापर थांबविला की कोंडा पुन्हा उफाळून येतो. कोंड्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळविण्यासाठी करून पाहा पुढील आयुर्वेदिक आणि पारंपरिक उपाय.
ग्लिसरीन आणि गुलाब जल हे एकास तीन या प्रमाणात घेऊन बाटलीत ठेवा. रोज स्रान केल्यानंतर हे औषध हातात घेऊन बोटांच्या सहाय्याने केसांच्या मुळांशी लावा. कोंडा दूर होईल.

- खोबरेल तेलात कापूर मिसळा आणि हे तेल रोज केसांना लावा. थोड्याच दिवसात कोंडा निघून जाईल. 


- लिंबाचा रस केसांच्या मुळांशी लावा. यानेही कोंडा दूर होतो.

- दह्याने केस धुवा. कोंडा पळून जाईल.

- झोपण्यापूर्वी डोक्याला तेल लावा. कोरडेपणा दूर होईल.
थोडे नवीन जरा जुने