अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षकाला न्यायालयाने दिली ही शिक्षा


अलिबाग : जादा शिकवणी घेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली शिक्षकाला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अक्षय पाटील (२२) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

खांदा पनवेल येथे राहणाऱ्या अक्षय पाटील याच्याकडे पीडित मुलगी शिकवणीसाठी जात होती. १२ जून, २०१५ रोजी आरोपीने पीडित मुलीवर जादा शिकवणी घेण्याच्या बहाण्याने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अत्याचार केला. पीडितेने खांदेश्वर पोलीस ठाण्यात अक्षय पाटील याच्या विरोधात फिर्याद दिली. खांदेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले. 

खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात सुरू होती. सरकार पक्षातर्फे अतिरिक्तशासकीय अभियोक्ता ॲड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी सहा साक्षीदार नोंदवले. त्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. 

पोलीस उपनिरीक्षक एन. एम. जाधव यांचा तपास महत्त्वाचा ठरला. सर्व साक्षीपुरावे अक्षय पाटीलच्या विरोधात सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली.
थोडे नवीन जरा जुने