कुमकुवत रोगप्रतिकारशक्ती झालीये हे कसं ओळखाल ?


शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचे अनेक संकेत आहेत, फक्त ते माहिती असायला हवेत. तज्ज्ञांच्या मते या संकेतांबाबत माहिती नसल्याने पीडित त्याकडे लक्ष देत नाही. यामुळेच तो योग्य निर्णयही घेऊ शकत नाही.जाणून घेऊया शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचे संकेत देऊ शकणार्‍या अशाच काही लक्षणांबाबतीत...

वजन वाढणे - जर तुमचे वजन अनियंत्रित होत असेल म्हणजेच चरबी वाढत असेल तर हे हृदय, मेंदू आणि शरीराच्या इतर अवयवांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. 

त्याचबरोबर यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही कमकुवत होते. तज्ज्ञांच्या मते वजन वाढल्याने हार्मोन्सवर त्याचा परिणाम जाणवतो आणि बाह्य संसर्गाशी लढण्याची शारीरिक क्षमता कमकुवत व्हायला लागते.

दातांचे विकार - गोड खाद्यपदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करणे दातांसाठी हानिकारक ठरू शकते. ‘अमेरिकन र्जनल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन्स’च्या एका संशोधनानुसार, 100 ग्रॅम साखरेचे सेवन (उदाहरणार्थ दोन ते तीन सोडा कॅन) जरी अप्रत्यक्षपणे केले तरी यामुळे शरीराच्या पांढर्‍या रक्तपेशींना नुकसान पोहोचते. तज्ज्ञांच्या मते ही प्रक्रिया पाच तासांच्या आत सुरू होते. त्यामुळे गोड पदार्थ जास्त खाणे टाळावे.

सततचा तणाव - जर तुम्ही कार्यालयीन काम लवकर आटोपण्याच्या दबावात असाल आणि त्याचदरम्यान सर्दी-खोकल्याने त्रस्त असाल तर त्यासाठी तुमचे कामच जबाबदार आहे, असे समजावे. ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’च्या अहवालानुसार, जास्त वेळेपर्यंत ताण घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत व्हायला लागते. त्यामुळेच संसर्ग होण्याची शक्यताही वाढते.

पाण्याचा अभाव - विषारी पदार्थ नष्ट करण्यासाठी शरीराला भरपूर पाण्याची गरज असते. जर तुमच्या लघवीचा रंग पिवळा असेल तर तुम्ही भरपूर पाणी पीत नाही, असा त्याचा अर्थ होतो. तसेच चहा आणि कॉफीचे अधिक सेवन केल्यानेही शरीर डिहायड्रेट होते.

कोरडे होणे - नाक वाहणे भलेही थोडेसे त्रासदायक वाटत असेल; परंतु यामुळे थंडी किंवा तापापासून संरक्षण मिळते. म्युकस (कफ किंवा बलगम) यामुळे बाह्य व्हायरस शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. याउलट जर नसल पॅसेज (नाकातील मार्ग) खूप कोरडा असेल तर हानिकारक बॅक्टेरिया सहजपणे शरीरात प्रवेश करू शकतात. तसेच यामुळे इरिटेशनही व्हायला लागते. जर दीर्घ काळापर्यंत कोरडेपणा राहत असेल तर याकडे कधीही कानाडोळा करू नये, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा. 

मनमुराद हसण्यासारखे कोणतेच चांगले औषध नाही. हसण्यामुळेही प्रतिकारशक्ती बळकट राहू शकते.
१ धूम्रपान करू नये. यामुळे प्रतिकार करणार्‍या पेशींची सक्रियता बाधित होते.

२ डायटिंग करण्याची चूक करू नका, कारण डायटिंगमुळे शरीराला संरक्षण देणार्‍या पेशींना नुकसान पोहोचते.

३ बागेत कीटकनाशकाचा वापर करणे, वायुप्रदूषण आणि सिगारेटच्या धुरात असलेल्या हानिकारक आणि विषारी घटकांमुळेही प्रतिकारशक्ती दुबळी होते.
थोडे नवीन जरा जुने