तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने, 'ह्या '10 आजारांपासून राहाल दूर, घ्या जाणून !


भारतात प्राचीन काळापासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे फक्त निर्जंतुकच होते असे नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात प्रविष्ट होतात.

हे लक्षात ठेवा, तांब्याच्या भाड्यात कमीतकमी आठ तास ठेवलेले पाणीच लाभकारी असते. ज्या लोकांना कफची समस्या जास्त प्रमाणात असेल त्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत. फार कमी लोकांना तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे महत्त्व माहिती असावे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास कोणकोणते लाभ होतात.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी - 

अनेकजण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सचा वापर करतात. त्यांचा असा समाज असतो की, चांगल्या प्रकारचे कॉस्मेटिक्स वापरल्याने त्वचा सुंदर होते, परंतु हे सत्य नाही. त्वचेवर सर्वात जास्त प्रभाव तुमच्या दिनचर्येचा आणि खानपानाचा पडतो. यामुळे जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचा उजळेल.

थायरॉइड :

आयोडीनच्या अति प्रमाणामुळे थायरॉक्सिन ट्रलथायरो आयोडीन या संप्रेरकाचे निर्माण आणि संतुलन बिघडते अन् हायपोथायरॉइडची स्थिती उद्भवते. थायरॉइडच्या प्रमुख लक्षणांमध्ये लकवर वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे. थायरॉइड एक्स्पर्ट मानतात की तांब्याचा स्पर्श असलेले पाणी शरीरातील थायरॉक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास हा आजार नियंत्रणात येतो.


सांधेदुखी

आजकाल कमी वयातच अनेक लोकांना सांधेदुखीचा आजार होत आहे. तुम्हीही या आजारामुळे त्रस्त असाल तर दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. सांधेदुखीमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने लाभ होतो. तांब्याच्या भांड्यातील गुणामुळे शरीरात यूरिक एसिडचे प्रमाण कमी होते आणि सांधेदुखीमध्ये होणार्या त्रासापासून आराम मिळतो.


नेहमी तरुण दिसण्यासाठी

असं म्हटले जाते की, जी व्यक्ती जास्त पाणी पिते तिच्या त्वचेवर जास्त वयातही सुरकुत्या दिसत नाहीत. ही गोष्ट एकदम खरी आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिले तर त्वचेतील लुळेपणा दूर होतो. डेड स्किन (मृत त्वचा) निघून जाते आणि चेहरा नेहमी उजळ दिसतो.


पाचन क्रिया व्यवस्थित राहते

अ‍ॅसिडिटी,गॅस किंवा पोटाची दुसरी समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान काम करते. आयुर्वेदानुसार जर तुम्हाला शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याची इच्छा असेल तर तांब्याच्या भांड्यात कमीत कमी ८ तास ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे पाचन क्रिया व्यवस्थित राहते.


रक्ताची कमतरता

अ‍ॅनिमिया किंवा रक्ताची कमतरता ही एक अशी समस्या आहे, ज्यामुळे ३० वयापेक्षा जास्त वयाच्या अधिक भारतीय महिला त्रस्त आहेत. कॉपरच्या बाबतीत हे तथ्य जास्त चकित करणारे आहे, की हे शरीरातील अधिकांश प्रक्रियेमध्ये खूप आवश्यक आहे.

याच कारणामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.


हृदयासाठी पोषक

तणाव आजकाल प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग होऊन बसला आहे. यामुळे हृदयाचे रोग आणि तणावाने ग्रासित लोकांची संख्या वाढत आहे. तुम्हालाही हीच समस्या असेल तर रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी पिल्यास संपूर्ण शरीरात रक्ताचा संचार व्यवस्थित होतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयाचे विकार दूर राहतात.


कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक

कॅन्सर असलेल्या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी अवश्य प्यावे. तांब्याच्य भांड्यातील पाणी वात, पित्त आणि कफाचा त्रास दूर करणारे आहे. या पाण्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट असतात, जे या आजाराशी लढण्याची शक्ती प्रदान करतात.


घातक सूक्ष्मजीव नष्ट होतात

तांब्याच्य भांड्यातील पाणी पिल्यास शरीरातील घातक सूक्ष्मजीव नष्ट होतात. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण मंडळानेदेखील तांब्याच्या जंतुनाशक गुणधर्माचा अभ्यास करून निर्जंतुकीकरणाची क्षमता असलेल्या घटकांत तांब या धातूचा समावेश केला आहे. या भांड्यातील पाणी पिल्याने डायरिया, अतिसार, कावीळ यासारख्या आजाराला कारणीभूत असलेले किटाणू नष्ट होतात.


वजन कमी करण्यात मदत होते

कमी वयात वजन वाढणे ही सध्याच्या काळातील एक कॉमन समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास लाभ होईल.

थोडे नवीन जरा जुने