रोज प्या एक ग्लास कोमट दुध,शरीरात होतील हे 10 आरोग्यदायी बदल !नियमित दूध प्यायल्याने शरीराचे अनेक रोग दुर होतात आणि शरीर स्वस्थ राहते. दुधामधील विविध पोषकतत्त्व मेंदुसाठीसुद्धा फायदेशीर आहेत. संशोधक सांगितात की, जे वयस्कर लोक दुध पितात त्यांची स्मरणशक्ती दुध न पिणा-यांपेक्षा जास्त असते. 


दूध पिणारे लोक दुध न पिणा-या लोकांच्या तुलनेत 5 टक्के जास्त सक्रिय आणि जास्त स्मरणशक्ती असणारे असतात. फक्त एवढेच नाही तर नियमित कोमट दुध पिण्याचे अनेक फायदे आहेत. अशाच काही खास फायद्यांची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

1. प्रोटीनचे प्रमाण जास्त


कोमट दुधामध्ये व्हीटॅमिन आणि प्रोटिन जास्त प्रमाणात असते, यामुळे डेली डायट मध्ये याचा उपयोग करावा. जर तुम्हाला मजबूत मांसपेशी हव्या असतील तर ब्रेकफास्टमध्ये दूध नक्की प्या.

2. कॅल्शियमची कमतरता दूर

जर तुमचे दात संवेदनशील असतील तर कोमट दूध तुम्हाला फायदेशीर आहे. कोमट दूधामध्ये कॅल्शियम, आयोडीन आणि फॉस्फोरस असते हे दातांना आणि हिरड्यांना मजबुत बनवते. जेवण करतांना दूध प्यायल्याने दातांवरची कोटींग चांगली राहते.
3. तनाव कमी होतो

जास्त तनाव आला असेल तर कोमट दुध प्या, यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. कोमट दुध मांसपेशी आणि शिरांना तनाव मुक्त करते.

4. ऊर्जा वाढवते

खूप काम केल्यानंतर थकवा जाणवल्यास कोमट दूध प्यायल्याने शरीरामध्ये पुन्हा ऊर्जा निर्माण होईल.


5. पीरियड्स मध्ये फायदेशीर

अनेक महिलांना पीरियड्समध्ये क्षणा-क्षणाला मूड बदलण्याची अडचण असते. अशावेळी एक ग्लास कोमट दूध प्यायल्याने चांगले वाटेल.

6. पूरक आहार

जे लोक कॅसरग्रस्त आहेत, ज्यांचे दात कमकुवत आहेत, अशा लोकांना कोमट दूध प्यायल्याने फायदा होतो. दूध एक असा आहार आहे जे शरीरीतील सर्व आहारांची कमतरता पुर्ण करतो.


7. चांगल्या झोपेसाठी

अनेक लोकांना झोप न येण्याची समस्या असते. असे असेल तर झोपण्याआधी एक कोमट ग्लास दूध प्या. दूधामध्ये अमीनो अॅसिड असते जे मेंदू शांत ठेवते आणि झोप येण्यास मदत करते.


8. गळ्याचे दुखणे दूर करते

जर गळ्यात दुखत असेल आणि सर्दी झालेली असेल तर दूध एक औषध म्हणून काम करते. हे गळ्यात संक्रमण निर्माण करणा-या जीवाणु नष्ट करते आणि दूखणे बरे करते.


9. बद्धकोष्ठता दूर करते

रात्री झोपण्याआधी एक कप कोमट दूध प्या. बध्दकोष्ठचा आजार दूर होईल.

10. शरीरातील पाण्याची कमतरता दुर

कोमट दूध शरीराला पुर्णपण रिचार्ज करते. व्यायाम केल्यानंतर थोड्या वेळाने कोमट दुध प्या. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटची कमी पुर्ण होईल आणि शरीर तात्काळ हायड्रेट होईल
थोडे नवीन जरा जुने