तुमचे सौंदर्य आणि आरोग्य बिघडवू शकतात 'या' 10 वाईट सवयी !काही महिला किंवा पुरुष दिसलायला खूप सुंदर असतात, परंतु काही दिवसानंतर जेव्हा तुम्ही त्यांना पाहता तेव्हा ते तुम्हाला तेवढे सुंदर दिसत नाहीत. यामागे विविध करणे आहेत. 


दैनंदिन कामाच्या ओघात आपण कळत-नकळतपणे अशा काही गोष्टी करतो, ज्यांचा प्रभाव आपल्या ब्युटीवर पडतो. स्किन डल होते, केस रफ आणि रुष्ट होतात, दात पिवळे दिसू लागतात. 

जर तुम्हाला तुमचे सौंदर्य कायम ठेवायची इच्छा असेल तर येथे सांगितलेल्या 10 वाईट सवयींपासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करा...

1- पिंपल्सला हात लावणे

अनेक महिलांना चेहर्यावरील पिंपल्सला वारंवार हात लावण्याची सवय असते. फक्त एवढेच नाही तर पिंपल्स नष्ट करण्यासाठी त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. असे केल्याने चेहर्‍यावर डाग पडतात आणि पिंपल्सचे प्रमाण वाढते. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे पिंपल्सला हात लावण्याची चूक करू नका, यामुळे चेहर्‍यावर ज्याठिकाणी पिंपल्स नाहीत तेथेसुद्धा पिंपल्स निर्माण होतील.

रात्री उशिरापर्यंत जागणे
रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने डोळ्याखाली काळे वर्तुळ दिसतात. यापासून दूर राहण्यासाठी पूर्ण झोप आवश्यक आहे. यामुळे सकळी चेहरा फ्रेश दिसेल. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड वाढते, जी तुमच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसते. यामुळे लवकर झोपावे आणि लवकर उठावे.


दाताने नख कुरतडणे
अनेक लोक पुरुष असो किंवा स्त्री, रिकाम्या वेळेत दातांनी नख कुरतडणे आणि चावणे सुरु करतात. काही लोक टेन्शनमध्ये असे करताना दिसतात. आता त्यांना कोणी समजून सांगावे की, नख कुरतडल्याने टेन्शन कमी होत नाही तर नखांमधील विषाणू, घाण पोटात जाते. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. नखे नेहमी स्वच्छ ठेवावेत, हातांवर गरम पाणी टाकून नखांमधील घाण काढू शकता.


व्यायाम न करणे
जर तुम्ही दिवसभर बसून राहिलात आणि फिरायला जाने किंवा व्यायाम केला नाही तर शरीरातील लठ्ठपणा वाढेल. तुम्हाला नेहमी आळस जाणवेल. व्याव्याम केल्याने चेहर्‍यावर चमक येते, टेन्शन कमी होते आणि तुम्ही नेहमी उर्जावन राहाल.


टेन्शन घेणे
असे म्हणतात की, जे तुमच्या मनात आहेत तेच चेहर्‍यावर दिसते. म्हणजेच तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर तुमचा चेहरा उदास दिसेल. परंतु तुम्ही नेहमी आनंदी राहणारे व्यक्ती असाल तर तुमचा चेहरा हसतमुख राहील आणि दिवसेंदिवस चेहर्‍यावरील उजळपणा वाढत राहील.


जंक फूड खाणे
ऑफिसमध्ये कामाचा एवढा ताण असतो की जंक फूड खाण्याची इच्छा होतेच. परंतु या सवयीवर निंयत्रण ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात जंक फूड खात असाल तर स्वतःसोबत हेल्दी फूड ऑफिसमध्ये अवश्य घेऊन जा. यामुळे तुमची जंक फूड खाण्याची इच्छा हळूहळू कमी होऊ लागेल. त्यानंतर पाहा हेल्दी फूड खाल्ल्याने तुमच्या चेहर्‍यावर किती उजळपणा येतो.


हात साबणाने न धुणे
अनेक लोक असे असतात जे खाण्यापिण्यापुर्वी हात धुवत नाहीत. या लोकांना आजारांची लागण लवकर होऊ शकते. तुम्ही मेट्रो, ट्रेन, रिक्षा, बस, गाडीवर बसून प्रवास करता, परंतु घरी आल्यानंतर हात साबणाने न धुता तुम्ही काही खाल्ल्यास पोटाचे आजार निर्माण होऊ शकतात.


डोके खाजवणे
डोक्यात खाज निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे केसातील कोंडा (डँड्रफ). यापासून दूर राहण्यासाठी दररोज केस स्वच्छ पाण्याने धुवावेत. डोके खाजवल्याने केसातील कोंडा नखांमध्ये जाऊन बसतो. त्यानंतर तुम्ही त्याच हाताने जेवण करता आणि आजरी पडता. फक्त एवढेच नाही तर डोके खाजवल्याने केसातील कोंडा कपड्यावर पडतो, ज्यामुळे तुम्हाला लोकांसमोर खजील व्हावे लागते.


पाणी न पिणे
लग्झरी लाइफ जगण्याची सध्याच्या काळात एवढी क्रेज झाली आहे की, ऑफिसमध्ये कोणे खुर्चीवरून उठण्यास तयार नाही. सर्वांना बेस्ट काम करायचे आहे आणि यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. ऑफिसमध्ये कमीतकमी भरपूर पाणी तरी प्या, यामुळे चेहरा ग्लो करेल, पोटाच्या समस्या नर्माण होणार नाहीत. पोट जेवढे साफ राहील चेहरा तेवढाच उजळ दिसेल.


चेहरा न धुणे
तुम्ही ऑफिसमधून घरी येता आणि थकव्यामुळे चेहरा न धुता झोपता. यामुळे तुमचा चेहरा सकाळी डल दिसू लागतो, हळूहळू चेहर्‍यावर सुरकुत्या पडू लागतात. तुमच्या चेहर्‍यावर एजिंग स्पॉट्सही दिसू लागतात. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा अवश्य धुवून घ्यावा.
थोडे नवीन जरा जुने