'हे' 12 घरगुती उपाय तुम्हाला माहित आहे का? एकदा अवश्य करून पहा!


सध्याच्या धावपळीच्या जगात मनुष्याला छोट्या-छोट्या शारीरिक आजारांचा सामना करावा लागतो. या छोट्या-छोट्या आजारातून लवकर बरे होण्यासाठी कोणालाही न विचारता औष घेणे ठीक नाही, यासाठी प्राथमिक उपचार म्हणून तुम्ही निसर्गाची मदत घेऊ शकता. 

दैनंदिन जीवनात आपण विविध पदार्थांचे सेवन करतो, परंतु त्यामधील औषधी गुणांची आपल्या माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांची माहिती सांगत आहोत. छोट्या-छोट्या आजारांपासून दूर राहण्यासाठी हे उपाय फार लाभदायक ठरतील.

दमा राहील नियंत्रणात: 

तुळशीची पाने चांगल्याप्रकारे वाटून त्यात काळी मिरी टाकून चावावे. दम्यात होणारा श्वसनाचा त्रास कमी होतो.


निरोगी त्वचेसाठी: 

दररोज सकाळी रिकाम्यापोटी अर्धा ग्लास गाजर रस पिल्यास त्वचा उजळते. तसेच त्वचेच्या नव्या पेशींची निर्मिती होते.


डोकेदुखीत आराम: 

काही लवंगा घेऊन त्याला हलके रगडा. या लवंगा स्वच्छ कपड्यात घेऊन त्याचा वास घ्यावा. डोकेदुखीत आराम मिळतो.


दात दुखीत कापूर उपयोगी

दात दुखत असल्यास कापूर दुखणार्‍या भागावर लावावा. कापसात थोडासा कापूर ठेवून तो लावल्यास आराम मिळतो.


खोकला होईल कमी : 

मक्याचे दाणे वाटून घ्या .त्यात काळे मीठ मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा खावे. घशाची सूज कमी होऊन खोकल्यात आराम मिळेल.
घशाचे दुखणे कमी होईल

एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे आयोडीनयुक्त मीठ मिसळून चुळा भरल्याने घशाचा त्रास कमी होतो. गरम मीठ कापडात टाकून गळ्याला शेक द्यावा आराम मिळतो.


मुतखड्यात उपयोगी: 

गहू आणि हरभरा पाण्यात उकळा. हे पाणी दररोज अर्धा-अर्धा ग्लास प्यावे. मुतखड्याचा त्रास कमी होतो.


होणार नाही त्वचा रोग: 

मीठ न टाकता हरभरा पीठाची भाकरी कराव्यात. दीड ते दोन महिने अशा भाकरी खाल्ल्यास अनेक रोगांपासून बचाव होतो. तसेच त्वचा रोगापासून रक्षण होते.


होणार नाही केस गळती: 

खोबरेल तेलात थोडेसे लिंबू रस मिसळून दररोज सकाळ -संध्याकाळ डोक्याची मालिश करावी. केसगळती कमी होते.


दुखण्यात मिळेल आराम: 

आंब्याची पाने गरम करून त्यावर मीठ लावून सुजलेल्या भागावर लावावे. दोन ते तीन तासांपर्यंतदुखणारा भाग बांधून ठेवा. काही वेळात दुखणे कमी होईल.


कोमट मधाची कमाल

कापणे किंवा जखम झालेल्या जागी कोमट मध लावून त्यावर पट्टी बांधावी. असे केल्याने दुखणे कमी होऊन आराम मिळतो.


तोंड सोलण्यावर उपयोगी

संपूर्ण तूर डाळ रात्रभर पाण्यात भिजवत ठेवावी. या पाण्याच्या मदतीने दिवसातून तीन वेळा चुळा भराव्यात. असे केल्याने दोन दिवसांत तोंड सोलण्याची समस्या कमी होते
थोडे नवीन जरा जुने