'हे' 13 हेल्थ प्रॉब्लेम्स करा घरीच ठीक, 'हे' आहेत रामबाण उपाय !बदलते वातावरण किंवा इतर कारणांमुळे छोटे-मोठे शारीरिक आजार होणायची शक्यता असते. परंतु हे आजार असे असतात ज्यासाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जाणे पसंत करत नाहीत आणि घरगुती औषध घेऊन आजार ठीक करण्याचा प्रयत्न करतात. 


अशा आजारांसाठी अ‍ॅलोपॅथीक औषधांशिवाय घरगुती उपाय जास्त प्रभावकारी ठरतात आणि यामुळे शरीराला कोणतेही नुकसान पोहचत नाही.

आज आम्ही तुम्हाला १३ फोटोंच्या माध्यमातून १३ रामबाण घरगुती उपाय सांगत आहोत.

पुदिना दुखण्यात उपयुक्त : मायग्रेन (अर्धशिशी)चा त्रास होत असल्यास पुदिन्याची ताजी पाने पाण्यात उकडून मिंट टी तयार करा. असा चहा पिल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.


गॅसेस राहणार नाही : पोटात गॅस होत असेल तर एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा हळद आणि चिमूटभर सैंधव मिसळून सेवन करा. यामुळे गॅस राहणार नाही.


आहारात गाजर : मुलांच्या आहारात दररोज एका गाजराचा अवश्य समावेश केला पाहिजे. यामुळे त्यांचा मेंदू तल्लख राहील आणि शारीरिक व मानसिक विकासही चांगला होईल.


तारुण्यपीटिका गायब होतील : चेहर्‍यावर तारुण्यपीटिका आल्या असतील तर त्यावर अंड्यातील पांढरा भाग लावावा. यामुळे तारुण्यपीटिका लवकर वाळतील आणि डागही राहणार नाही.

दूर होईल डोळ्यांचा थकवा : देशी गुलाबाच्या 9-10 पाकळ्या एक ग्लास पाण्यात काही तासांसाठी भिजवून ठेवा. या पाण्याने नियमितपणे डोळे धुतल्याने थकवा दूर होतो.


मलावरोध होणार नाही : सोप साखरेसोबत वाटून घ्या. झोपताना सुमारे 5 ग्रॅम चूर्ण हलक्या कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे पोटाच्या समस्या व मलावरोध राहणार नाही.


चक्कर येणे बंद होईल : चक्कर येत असल्यास अर्धा ग्लास पाण्यात दोन लवंग टाकून ते उकळा. नंतर हे पाणी थंड करून प्यावे, आराम मिळतो.
बीपी राहिल नियंत्रणात : लिंबूमध्ये मोठय़ा प्रमाणात पोटॅशियम आढळते. हा रक्तदाब(बीपी) नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. बीपीने त्रस्त व्यक्तींनी नियमितपणे लिंबू रस पिला पाहिजे.


नजर चांगली होईल : दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा जिरे खाल्ल्याने नजर चांगली होते. सोबतच रक्तदाबाची पातळीही नियंत्रित राहते.


जळजळ कमी होईल : डोळ्यात जळजळ होत असल्यास एक स्वच्छ कापड कोरफडीच्या रसात बुडवून त्याने डोळे पुसून घ्या. असे लागोपाठ केल्याने जळजळ कमी होईल.


एकाग्रता वाढेल : डिप्रेशनमध्ये एकाग्रतेची पातळी कमी होते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर दररोज सकाळी तुळशीच्या पानांचे सेवन करा. यामुळे एकाग्रता वाढेल.


दात दुखणार नाही : जर संसर्गामुळे दात दुखत असतील तर लसणाच्या दोन-तीन कच्च्या पाकळ्या चावून खा. यामुळे संसर्ग दूर होईल आणि वेदनाही कमी होतील.


भूक वाढते : भूक लागत नसेल तर आल्यात बारीक किस करून मीठ मिसळावे. हे मिर्शण आठ दिवस दररोज खावे. याने पोट साफ होईल आणि भूक लागेल.
थोडे नवीन जरा जुने