अनेक वेळा पत्नी इच्छा नसताना देखील या 2 गोष्टी पती पासून लपवून ठेवते


आपल्या सर्वांना माहीत आहे की पती आणि पत्नीचे नाते हे एक अनमोल नाते आहे. प्रत्येक पतीपत्नीचे नाते हे विश्वासाच्या आधारावर टिकलेले असते. यामध्ये दोघे एकमेकांना लॉयल (निष्ठावंत) तेव्हाच मानतात जेव्हा दोघे एकमेकांना आपल्या मनातील सर्व गोष्टी खरेखरे सांगतात आणि कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही किंवा खोटे बोलत नाही. पण तरीही अनेक वेळा पत्नी इच्छा नसताना देखील काही सत्य आपल्या पती पासून नेहमी लपवून ठेवतात. कारण, त्यांचे बोललेले एक असत्य त्यांच्या नात्याला मजबूत ठेवते.

नेहमी पती विचार करतात की त्यांची पत्नी त्यांच्या सोबत कधीही खोटे बोलू शकत नाही. त्यांचा हा अंधविश्वास एक पद्धतीने बरोबर पण आहे. तरीही ते यागोष्टी पासून अज्ञात राहतात की जीला ते सत्याची देवता मानत आहेत, ती आपल्या मनात अनेक असत्याचे ओझे घेऊन जगत आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये पत्नीचे 2 असत्य सांगणार आहोत ज्यांना त्या नेहमी आपल्या पती पासून लपवून ठेवतात.

आपल्या भारतात परंपरा आहे की पती आपला सर्व पगार किंवा उत्पन्न आपल्या पत्नीच्या हातामध्ये देतात जेणेकरून ती घरखर्च चालवू शकेल. पण, तुम्हाला हे समजल्यावर आश्चर्य होईल की पत्नी नेहमी आपल्या पती पासून लपवून काही पैसे बचत करून ठेवते. ती हे पैसे शॉपिंगसाठीच खर्च करेल असे जरुरी नाही. तर काही पत्नी अत्यंत समझदार असतात.

यासाठी बऱ्याचदा त्या आपले पैसे बैंकेत जमा करून ठेवतात जेणेकरून वाईट प्रसंगी ती रक्कम उपयोगी येईल किंवा त्या या पैश्यातून आपल्या मुलांच्यासाठी आणि घरासाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करतात. त्यामुळे कोणतीही पत्नी आपल्या पतीला महिन्याच्या शेवटी उरलेल्या पैश्यांचा हिशोब व्यवस्थित देत नाहीत किंवा सांगत नाही.

आपल्या भारतीय महिला अन्य देशाच्या तुलनेत अतिक्षय हुशार आहेत समझदार आहेत. प्रत्येक वाईट प्रसंगी किंवा कठीण काळातून मार्ग कसा काढायचा हे त्यांना सहज जमते. भलेही हा प्रसंग मुलांवर आलेला असो किंवा परिवारावर त्या कोणताही त्रागा किंवा दुखः न करता प्रत्येक त्रास सहन करतात. पुरुषांची ही सवय असते की ते आपल्या प्रत्येक त्रासाची किंवा वाईट प्रसंगाचा सर्व राग घरी ओरडाआरडा करून भांडून बाहेर काढतात. पण महिला आपल्या कुटुंबाला आणि मुलांच्या निगडीत अनेक समस्या एकटी सांभाळते.

महिलांच्या अनुसार त्या पतीला आपल्या समस्या सांगत नाहीत लपवून ठेवतात याचे कारण की त्यांचा पती त्यांना चुकूनही वाईट किंवा चुकीचे समजू नये याकरिता. म्हणून महिला इच्छा नसताना देखील घरातील लहानमोठ्या समस्या पती सोबत शेयर करणे टाळतात किंवा लपवून ठेवतात.
थोडे नवीन जरा जुने