नॅनोचा असाही विक्रम 2019 मध्ये विकाल्या गेल्या फक्त इतक्या गाड्या


मुंबई : सर्वसामान्यांच्या आवाक्यातील गाडी म्हणून नॅनोचा उल्लेख करण्यात येतो. मात्र या नॅनो प्रकल्पाला घरघर लागली असून, 2019 मध्ये केवळ एकच नॅनो गाडी विक्री झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नॅनो गाडी लवकरच निवृत्त होणार असल्याचे संकेत मिळत आहे. 

केवळ फेब्रुवारी 2019 एक टाटा नॅनो विकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कंपनीने नियमानुसार सादर केलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2019 मध्ये टाटा नॅनोच्या एकाही गाडीची निर्मिती किंवा विक्री झाली नाही. 

त्याचवेळी डिसेंबर 2018 मध्ये टाटा नॅनोच्या 82 गाड्यांची निर्मिती करण्यात आली होती आणि 88 गाड्या विकल्या गेल्या होत्या. नोव्हेंबर 2019 मध्ये एकाची नॅनोच उत्पादन किंवा विक्री झाली नाही. नोव्हेंबर 2018 ची परिस्थिती बघितल्यास 66 गाड्यांची निर्मिती करण्यात आली आणि 77 गाड्यांची या महिन्यात विक्री करण्यात आली होती.

ऑक्टोबर 2018 मध्ये नॅनोच्या 71 गाड्या बाजारात आल्या होत्या. तर 54 गाड्या विकल्या गेल्या होत्या. परंतु, ऑक्टोबर 2019 मध्ये एकाही गाडीची निर्मिती किंवा विक्री झाली नाही. गेल्या संपूर्ण वर्षभरात (2019) कंपनीने फेब्रुवारी वगळता एकाही नॅनो गाडीची विक्री केली नाही. त्यामुळे नॅनो गाडी लवकरच निवृत्त होणार असल्याचे कळते.
थोडे नवीन जरा जुने