2020 या 5 राशींचं भविष्य उजळणार, व्यवसायात उत्तुंग संधी, धनलाभ होणार, कौटुंबिक तणावातून मुक्त व्हाल !


मेष - आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता 

घरगुती उपचारांमुळे आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. तणावातून मुक्ती मिळेल. सामाजिक कामांमध्ये आवड वाढू शकते. जोडीदारासोबत परदेश यात्रेचा योग आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

कुंभ - व्यवसायात चांगली संधी मिळेल
शिक्षण स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात चांगली संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कार्य कौशल्यामुळे पदोन्नतीची संधी मिळेल. रचनात्मक कामांमध्ये यश मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध सुमधुर राहतील.

मीन - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
व्यवसायात सावधगिरी बाळगा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. एखादे चांगले वृत्त मिळण्याची शक्यता आहे. वयोवृद्धांच्या आरोग्यावर लक्ष द्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.


वृषभ - कामाच्या ठिकाणी वाद टाळा
प्रेम संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद टाळण्याचा प्रयत्न करा. पदोन्नती रखडण्याची शक्यता आहे. व्यवसायात फसवणूक होऊ नये यासाठी विशेषतः सावधगिरी बाळगा. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील.

मिथुन - धन लाभाची शक्यता
आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. रखडलेल्या महत्त्वपूर्ण कामांना गती मिळेल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. वाहन सुखात वृद्धी होईल. जोडीदारासोबत चांगले क्षण व्यतीत कराल.

कर्क - दातदुखीमुळे हैराण असाल
दात दुखीच्या समस्येमुळे हैराण व्हाल. धावपळ अधिक राहील. आर्थिक प्रकरणांत प्रगती होण्याचा योग आहे. व्यवसायात राजकीय सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठं यश मिळेल. प्रेम प्रस्तावाचा स्वीकार होईल.

सिंह - अपत्याकडून खूशखबर मिळेल
वादांमध्ये अडकण्याऐवजी नवीन करारांवर लक्ष द्या. अपत्याकडून खूशखबर मिळेल. नातेवाईकांच्या छोट्याछोट्या गोष्टींचं वाईट वाटून घेऊ नका. आर्थिक स्थितीत सुधार होण्याचे संकेत आहेत.

कन्या - व्यवसायात चढ-उताराची स्थिती
व्यवसायात चढ-उताराची स्थिती राहील. खासगी कार्यासाठी शिफारस करावी लागू शकते. कायदेशीर वाद वाढण्याची शक्यता आहे. मित्रांचं सहकार्य मिळेल. व्यवहारात सावधगिरी बाळगा.

तूळ - भेटवस्तू-धन वाढीचे संकेत
भेटवस्तू किंवा धनसंपदेत वाढ होईल. घरातील सुखसुविधांचा विस्तार होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीसंबंधी कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. स्वतः म्हणणं पटवून देण्यात यश मिळेल.

वृश्चिक - व्यावसायिक अडचणी निर्माण होण्याची भीती
आयात-निर्यातसंबंधीत व्यावसायिकांना काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च-उत्पन्नावर नियंत्रण ठेवा.

धनु - वृद्धांच्या आरोग्याकडे लक्ष द्या
कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अडचणी येण्याची शक्यता आहे. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण होतील.

मकर - कौटुंबिक तणाव कमी होईल
वडील किंवा उच्च अधिकाऱ्याची मदत मिळवण्यास यश मिळेल. कौटुंबिक तणाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणांमध्ये यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता. प्रवासाचा योग आहे.
थोडे नवीन जरा जुने