दररोज 20 शेंगदाणे खाल्ल्यास शरीरात होतील 'हे' आश्चर्यकारक बदल !


शेंगदाण्याला स्वस्त काजू म्हटले जाते. यामध्ये चविसोबतच विविध प्रकारचे आरोग्याला लाभ करून देणारे आरोग्यदायी गुण आढळून येतात. शेंगदाण्याचे तेलसुद्धा चव आणि आरोग्यासाठी खूप प्रचलित आहे. याला प्रोटीनचे सर्वात स्वस्त वनस्पतिक स्रोत मानले जाते. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण मांसापेक्षा 1.3 टक्के, अंड्यापेक्षा 2.5 टक्के आणि फळांपेक्षा 8 टक्क्यांनी जास्त असते. 100 कच्च्या शेंगदाण्यामध्ये 1 लिटर दुधाएवढे प्रोटीन असते.

शेंगदाणे आयर्न, नियासिन, फॉलेट, कॅल्शिअम आणि झिंकचा उत्तम स्रोत आहे. मुठभर शेंगदाण्यामध्ये 426 कॅलरीज, 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 17 ग्रॅम प्रोटीन आणि 35 ग्रॅम वसा असतो. यामध्ये व्हिटॅमिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात असते. शेंगदाण्याचे वर सांगण्यात आलेले पोषक तत्त्व प्राप्त करण्यासाठी दररोज लाल आवरण असलेले कमीतकमी 20 शेंगदाणे अवश्य खावेत.

1. शेंगदाण्यामध्ये तेलाचा अंश असल्यामुळे हे पोटाचे आजार नष्ट करतात. यांच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. तसेच गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.

2. शेंगदाणे खोकल्यामध्ये उपयुक्त औषधीचे काम करतात. याच्या नियमित सेवनाने आमाशय आणि फुफ्फुसाला मजबुती मिळते. पचन शक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्या दूर होते.


3. शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले मानले जाते. हे गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.

4. शेंगदाण्यामध्ये ओमेगा-6 फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात, जे स्वस्थ कोशिका आणि चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. यामुळे शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.


5. जेवण झाल्यानंतर 50 किंवा 100 ग्रॅम शेंगदाणे दररोज खाल्ल्यास तब्येत चांगली बनते, अन्न पचते आणि रक्ताची कमतरता भासत नाही.

6. आठवड्यातून पाच दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो.


7. शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात 5.1 टक्क्याने कमतरता येते. या व्यतिरिक्त कमी घनत्व असलेल्या लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (एलडीएलसी)ची मात्रा 7.4 टक्क्यांनी घटते.


8. यामध्ये प्रोटीन, लाभदायक वसा, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे याच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते.

9. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते, यामुळे हाडे मजबूत होतात.

10. असे मानले जाते की, दररोज थोडेसे शेंगदाणे खाल्ल्यास महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे संतुलन कायम राहते.
थोडे नवीन जरा जुने