31 डिसेंबरला पार्टीत घडलं असं काही की... प्रसिद्ध उद्योगपतीसह कुटुंबातील 6 जणांचा झाला दुर्दैवी अंत !


इंदुर - महूमधील ख्यातनाम उद्योगपती आणि पाथ इंडिया कंपनीचे डायरेक्टर पुनीत अग्रवाल यांचा कुटुंबासह दुर्दैवी अंत झाल्याची घटना काल 31 डिसेंबरला घडली. पुनीत अग्रवाल आपल्या पातालपानीमधील फार्म हाउसवर 31 डिसेंबरला पार्टी करण्यासाठी गेले होते. 

येथे पुनीत अग्रवाल आपली पत्नी, मुलगी, जावई, नातू आणि इतर दोन नातेवाईंकासोबत नववर्षाचा आनंद लुटत होते. यावेळी अग्रवाल कुटुंब फार्म हाउसवरील टॉवरमध्ये लागलेल्या कॅप्सूल लिफ्टमधून उतरत असताना लिफ्ट 70 फूट ऊंचीवरुन कोसळली. 

या अपघातात 53 वर्षीय उद्योगपती पुनीत, 27 वर्षीय मुलगी पलक, 28 वर्षीय जावई पलकेश अग्रवाल, 3 वर्षीय नातू नव, पलकेशचे 40 वर्षीय भाऊजी गौरव अरोरा आणि 11 वर्षीय मुलगा आर्यवीरचा दुर्दैवी अंत झाला तर गौरवची पत्नी निधी गंभीर जखमी आहे.

महूचे एएसपी धर्मराज सिंह मीणा यांनी सांगितल्यानुसार पाथ इंडियाचे डायरेक्टर पुनीत अग्रवाल आपल्या कुटुंबासह फार्म हाउसवर नववर्षाचा जल्लोष करण्यासाठी गेले होते. सर्व कुटुंबीय फार्म हाउसमधील एका टॉवरवर चढले, परत उतरत असताना लिफ्टचे दोर तुटले आणि लिफ्ट खाली कोसळली. 

त्यानंतर फार्म हाउसवरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवली आणि पोलिसांना सूचना दिली. आधी सर्व जणांना महूच्या मेवाडा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते, नंतर चोइथराम हॉस्टीटलला रेफर केले. तिथे रात्री उपचारादरम्यान 6 जणांचा मृत्यू झाला.

प्रकाश एस्फॉल्टिंग्स अँड टोल हायवे इंडिया लिमिटेड म्हणजेच पाथ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर पुनीत अग्रवाल यांचे नाव देशातील त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये घेतले जाते, ज्यांना पीपीपी मॉडलचे पायोनियर म्हणतात. जेव्हा सरकारने पीपीपी मॉडल लॉन्च केले, तेव्हा पुनीत अग्रवालसारखे काही निवडक लोक समोर आले आणि या प्रोजेक्टचे काम केले. त्यांच्या कंपनीचे नाव देशातील काही टॉपच्या कंपनीत सामील आहे. 

त्यांची कंपनी पाथ इंडिया बीओटी, ओएमटी बेसिसवर रस्ते, पुल आणि टोल नाक्यांचे निर्मीती करते. सिंहस्थ 2004 वेळी इंदुरमध्ये एमआर-10 वर पीपीपी प्रोजेक्ट अंतर्गत पहिला रेल्वे ओवरब्रिज बनवणाऱ्या पुनीत यांनी महती योजना इंदुर-खलघाट नॅशनल हायवेचे काम केले आहे. त्यांच्या कंपनीने आतापर्यंत 2700 लेन हायवे आणि अंदाजे 3000 हायवे बनवले आहेत.
थोडे नवीन जरा जुने