"ह्या" कारणामुळे सकाळी लवकर उठाच, अन उठून फक्त ही 4 कामे करा !


सध्याच्या काळात अनेक लोक असे आहेत, जे सूर्योदयानंतरही बर्याच वेळानंतर अंथरुणातून बाहेर पडतात. झोपेतून उशिरा उठणे ही सवय चांगली नाही. ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या वेळी झोपेतून उठणे आवश्यक आहे. ही एक प्राचीन परंपरा आहे. 

तसं पाहायला गेल तर काही जणांसाठी हे कठीण काम आहे, परंतु सकाळी लवकर उठल्यास स्वास्थ्य लाभासोबत लक्ष्मी आणि इतर देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. दिवसभर शरीर उर्जवान राहते. येथे जाणून घ्या, या परंपरेशी संबंधित काही खास गोष्टी आणि सकाळी कोणकोणती कामे करावीत....

सकाळी-सकाळी प्यावे असे पाणी

सकाळी लवकर उठून तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यासाठी रात्री झोपताना तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर हे पाणी प्यावे. या उपायाने पोटाशी संबंधित छोटेछोटे आजार आपोआप ठीक होतील. पोट साफ राहते आणि त्वचा संबंधी आजारातून मुक्ती मिळू शकते. हा उपाय करण्यापूर्वी एखाद्या चिकित्सकाचा सल्ला अवश्य घ्यावा.
सकाळी लवकर उठून करावा योगा आणि ध्यान

सकाळी लवकर उठल्यानंतर नित्य कर्मातून निवृत्त होऊन योगा आणि ध्यान केल्याने शरीर उर्जावन राहते. जे लोक नियमितपणे सकाळी योगा करतात त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत आकर्षक राहते. अशा लोकांकडे कोणताही व्यक्ती आकर्षित होतो. चेहऱ्याचे तेज वाढते. प्रदीर्घ काळापर्यंत वृद्धावस्थेच्या आजारांपासून रक्षण होते. शरीराचे अवयव मजबूत राहतात.


सकाळची सुरुवात चांगली झाली तर दिवस जाईल चांगला

असे म्हणतात की, एखाद्या कामाची सुरुवात चांगली झाली तर सर्वकाही चांगले होते. ही गोष्ट सकाळी लवकर उठण्याच्या परंपरेवरही लागू होते. सकाळी-सकाळी लवकर उठल्यानंतर हातांचे दर्शन घेतल्यास तुमच्या संपूर्ण दिवस शुभ जाऊ शकतो. तळहाताचे दर्शन म्हणजे कर दर्शनाचे महत्त्व सर्वांनाच चांगल्याप्रकारे माहिती आहे. हा उपाय केल्यास विष्णू, लक्ष्मी आणि सरस्वतीची कृपा प्राप्त होते. अंथरुणातून पाय खाली जमिनीवर ठेवताना भूमीला नमस्कार करावा आणि पाय खाली ठेवण्यासाठी क्षमा याचना करावी. असे केल्यास धरणी मातेला पाय लावण्याचा दोष लागणार नाही.


शिरापर्यंत झोपल्याने प्राप्त होतात हे अशुभ फळ

जे लोक नियमितपणे सूर्योदयानंतर झोपेतून उठतात, त्यांच्या चेहऱ्यावरील तेज नष्ट होते. वृद्धावस्थेपूर्वीच त्वचा निस्तेज होते. दिवसभर शरीरात आळस राहतो. काम करण्यासाठी उत्साह राहत नाही. प्रदीर्घ काळापर्यंत ही सवय तशीच राहिली तर शरीर कमजोर होते. रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. विज्ञानानेही मान्य केले आहे की, सकाळी लवकर उठणे शरीरासाठी लाभदायक आहे.
थोडे नवीन जरा जुने