या 5 गोष्टी सुनेने वाचल्या ना, तर कधीच सासूसोबत भांडणं होणार नाही !


भारतीय समाजात विवाह हा दोन व्यक्तींचा नाही दोन कुटुंबांचा असतो. अशात आपल्या पतीच्या घरच्यांसोबत सामंजस्य बाळगणे मुलींसाठी आवश्यक असते. अशात आपल्या सासूसोबत जुळवून घेणे कठीण मानले जाते. मात्र समजुतदारपणा आणि प्रेमाने हाताळल्यास हे कठीण काम सहज सोपे होऊ शकते. जाणून घ्या अशाच पाच गोष्टी ज्या सुनेने स्वीकारल्या तर सासु सोबतचे संबंध मजबूत होऊ शकतात.

अशाप्रकारे सासूसोबत सुदृढ नाते निर्माण करा

आपली वर्तणूक बदला

तुमची सासू प्रत्येक कामत चुका काढते का? आणि त्यांची ही सवय कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असेल तर तुम्ही तुमची वर्तणूक बदला. प्रत्येक कामात सफाई देणे किंवा भांडण करण्यापेक्षा गप्प राहा. विनाकारण भांडणांपासून वाचा. तुमच्या प्रतिसाद न देण्याने सासूचा व्यवहार देखील बदलेल. या बाबतीत संयमाने काम करणे चांगले होईल.

प्रशंसा करू द्या

जर तुमचा सासू स्वतःची प्रशंसा करण्याची एकही संधी सोडत नसेल किंवा तुमचा पती आईच्या जेवणाची प्रशंसा करत असेल तर तुम्हा नाराज होऊ नका. काही झाले तरी ती तुमच्या पतीची आई आहे आणि आईच्या हातच्या जेवणाची गोष्ट काही औरच असते. ही गोष्ट तर तुम्ही पण समजू शकता.

कमी बोला

तुम्हाला असे वाटत असेल की जास्त बोलण्यामुळे सासूसोबत भांडण होण्याची शक्यता आहे तर अशावेळी तुम्ही शांत राहण्यात समजुतदारपणा आहे. तुमचे मौन त्यांना त्रासदायक होईल पण त्यांना भांडण करण्याची एकही संधी देऊ नका. तसं ही जास्त बोलण्यामुळे काही ना काही चुकीचे बोलण्याची शक्यता जास्त असते. यामुळे असा व्यवहार वाद होण्यापासून वाचवेल.

मुले आणि आजीच्या मध्ये पडू नका

आपले मुले आणि आजीमध्ये येऊ नका. कारण आजी आणि नातू-नात यांच्या खूपच विशिष्ट नाते असते. तुमची सासू तुमच्यापेक्षा तुमच्या मुलांवर जास्त प्रेम करेल. याबाबत तुम्हाला आनंदी व्हायला हवे. मुले आपल्या आजी-आजोबांकडून बरेच काही शिकत असतात. तसेच ते मुलांना चूक-बरोबर याविषयी सांगत असतात.

कामाबाबत वाद घालू नका
तुम्ही घरची सून आहात. एखादी मशीन नाही की सगळे काम एकाचवेळी करू शकता. जितके काम करू शकता तितकेच काम हातात घ्या. गरजेपेक्षा जास्त कामामुळे थकवा आणि चिडचिड होईल. म्हणून आपले कार्य स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत करणे महत्वाचे आहे जेणेकरुन कामामुळे भांडण होणार नाही.
थोडे नवीन जरा जुने