'या' 5 फळांच्या सेवनाने निद्रानाश कायमचा दूर होईल...जाणून घ्या !


जर दिवसभर अतिश्रम करूनदेखील रात्री नीट झोप लागत नाही, तर झोपण्यापूर्वी काही फळे खाल्ली पाहिजे. असे केल्याने लवकर आणि आरामदायी झोप येते.

अनेक वेळा जास्त आणि थकवा आणणार्‍या कामानंतरदेखील बहुतांश व्यक्तींना नीट झोप येत नाही. असे लोक खासकरून झोपेच्या गोळ्यांची मदत घेतात. या गोळ्यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. याऐवजी रात्री झोपण्यापूर्वी काही खास फळे खाल्यास चांगली झोप येण्यास मदत होईल.

चेरी : 


एक आठवड्यापर्यंत दररोज दोन वेळा चेरीचा रस पिल्याने झोपण्याचा कालावधी 25 मिनिटांपर्यंत वाढू शकतो. यात एल-ट्रायप्टोफेन आढळते. जो सेरोटोनिन हार्मोन्स तयार करतो. सेरोटोनिनने शरीराला आराम मिळतो आणि झोप येण्यास मदत होते. सेरोटोनिनने शरीरातील स्नायूमध्ये ऑक्सिजन सहज पोहोचतो आणि स्नायूंना आराम मिळतो.

पॅशनफ्रूट टी : 

पॅशनफ्रूट टी पिणार्‍यांना झोप चांगल्या प्रकारे येते, असे संशोधकांना दिसून आले आहे. पॅशनफ्रूटमध्ये असणारे केमिकल हार्मन एल्कालॉइडस व्यक्तीच्या केनर्वस सिस्टिमवर परिणाम करून झोप येण्यात मदत करतो. दररोज झोपण्यापूर्वी पॅशनफ्रूट टी पिल्याने शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप येते.


चायनीज फूड : 

गामा एमिनोब्यूट्रिक अँसिड(जीएबीए) शरीरातील मज्जारज्जू प्रणालीला आराम मिळू देत नाही. जीएबीए ला कमी करण्यासाठी ग्लुटेमिक अँसिडचे सेवन केले पाहिजे. हे अँसिड चायनीज फूडमध्ये वापरले जाते. रात्री थोड्या प्रमाणात शाकाहारी-मांसाहारी चायनीज पदार्थ खाल्ल्यास चांगली झोप येण्यास मदत होते.


खजूर : 

खजुरात एल-ट्राइप्टोफेन नावाचा घटक आढळतो. यासोबत यात काही प्रमाणात साखरदेखील असते. हे दोन्ही पदार्थ एकत्र येऊन शरीराला आराम देत चांगली झोप येण्यास मदत करतात. दररोज रात्री झोपण्याच्या एक ते दोन तास आधी दोन खजूर खाल्ल्याने चांगली झोप येईल.


काबुली चण्याची चटणी : काबुली चण्याच्या चटणीत थोड्या मसाल्यांसोबत काही प्रमाणात तीळ मिसळलेले असते. यात मुबलक प्रमाणात एमिनो अँसिड असते. हा घटक झोप येण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. या चटणीत काही मसाले मिक्स केल्याने यात झोप येण्यासोबत चव वाढणारे घटकदेखील समाविष्ट होतात. जे लाभकारक असतात.
थोडे नवीन जरा जुने