'हे' 5 उपाय ठेवतील नेहमी तुमचा मूड फ्रेश !


धकाधकीच्या जीवनात होणार्‍या धावपळीमुळे थकवा येणे स्वाभाविक आहे. कधी कामाचा ताण तर कधी बॉस तुमच्यावर नाराज असल्याने निर्माण होणारा न्यूनगंड यामुळे तुमच्या मूडची पार वाट लागते. 

काही नवीन करायचा विचार असतो. मात्र, मूड खराब झाल्यामुळे नवे तर सोडाच जुने कामही लटकून जाते. 

घरी आल्यानंतरही आपल्या डोक्यात त्याच त्या गोष्टी असताना आणि आपल्यासोबत घरच्यांचाही दिवस खराब होतो.   त्यामुळे आपल्यासाठी काही टिप्स आहेत.

प्रवासात म्युझिक ऐका

कामानिमित्त तुम्ही जास्त प्रवास करत असाल तर उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. प्रवासात म्युझिक ऐकल्याने हा धोका टळतो.

कामादरम्यान ब्रेक घ्या.

काम करताना थकवा जाणवत असेल तर कामात ब्रेक घेणे आवश्यक असते. कॅलिर्फोनिया विद्यापीठातील संशोधकांनी एका अभ्यासात हा निष्कर्ष काढला आहे. स्वीडनीच्या एका अहवालानुसार, आठवड्यातून दोनदा व्यायम केल्याने कार्यक्षमता वाढते.


खेळीमेळीचे वातावरण निर्माण करावे.

व्यक्ती आपला सगळ्यात महत्त्वाचा वेळ ऑफिसात घालवतो. त्यामुळे आपले ऑफिस हे आपले दुसरे घर असते. ऑफिसातील सहकारी आले कुटूंबातील सदस्य असतात. त्यामुळे त्यांच्या मैत्रीपूर्वक संबंध निर्माण करावे. ऑफिसात खेळीमळीचे वातावरण निर्माण करावे राहते. याने काम करायला उत्साह तर येईलच पण त्याचबरोबर आरोग्य उत्तम राहते.


हेल्दी ब्रेकफास्ट करा.

पोष्टिक आहाराने मूड चांगला राहतो आणि काम करण्याची क्षमता वाढते, असे कॅनडामधील एका अहवालात सांगितले आहे. सकाळी न्याहारी करताना दही, आकरोड आणि फळे खा. आकरोडमधील एन्टी ऑक्सिडेंटमुळे स्मरणशक्ती वाढते. प्रोटीनमुळे भूक कमी लागते व शरीरही तंदरुस्त राहते.


पुरेशी झोप घ्या 

दररोज किमान सात तास झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घेतल्याने शरीर तंदरुस्त राहते. मन प्रसन्न राहिल्याने कामातील उत्साह वाढतो.
थोडे नवीन जरा जुने