आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी, ह्या 5 सवयी आजच जोपासा !



कोणताही मनुष्य बहुतांश आजारांना स्वतः आमंत्रण देतो आणि औषध घेण्यासाठी डॉक्टरांकडे पळतो. आयुर्वेदानुसार मनुष्याच्या बहुतांश आजारांचे कारण त्याच्या छोट्या-छोट्या सवयी असतात. 


दिनचर्येशी संबंधित काही नियमांचे वर्णन आयुर्वेदामध्ये करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींविषयी सांगत आहोत, ज्यामुळे व्यक्ती नेहमी निरोगी राहू शकतो.

1. झोप न कमी न जास्त


ज्याप्रकारे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात आहाराची आवश्यकता असते ठीक त्याचप्रमाणे पर्याप्त झोपही आवश्यक असते. एका निरोगी व्यक्तीसाठी दिवसभरातून कमीत कमी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. बेडरूममध्ये टीव्ही, कॉम्प्युटर किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक सामान असू नये, कारण यांची उपस्थिती तुमच्या झोपेमध्ये अडथळा निर्माण करू शकते.

2. दररोज एक ग्लास गरम पाणी

एखादा हलका पदार्थ खाल्ल्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्यावे. हे तुमच्या डायजेशन पॉवरला वाढवेल आणि त्वचा उजळ होईल. या व्यतिरिक्त दिवसभर कमीत कमी आठ ग्लास पाणी अवश्य प्यावे. यामुळे शरीरातील विषारी तत्त्व बाहेर पडतील.


3. आरोग्यासाठी दररोज अर्धा तास

आठवड्यातील सात दिवस जिममध्ये जाण्याची काहीच आवश्यकता नाही. दररोज अर्ध्या तासाचा फेरफटका तुम्हाला फिट ठेवण्यासाठी पुरेसा आहे. घरातील काही सोपी योगासने आणि वाय्याम करू शकता. स्विमिंग, डान्सिंग आणि सायकलिंग करून स्वतःला फिट ठेवू शकता.


4. हेल्दी डाएट हेल्दी लाइफ

तुम्ही वजन कमी करण्याच्या तयारीत असाल तर उपाशी राहण्याची चूक करू नका. आहारामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिनचा समावेश करा. टीव्ही पाहताना स्नॅक्स खाण्याची सवय असल्यास, त्याएवजी फ्रुट, ज्यूस किंवा सूप घेण्याची सवय लावून घ्या.


5. स्मोकिंग अजीबात नाही

तुम्ही स्मोकिंगला बाय-बाय करण्याचा निश्चय केला असेल तर हे तुमच्या हेल्थसाठी खूप चांगले आहे. आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सच्या मदतीने तुम्ही या सवयीपासून लवकर मुक्त होऊ शकता.
थोडे नवीन जरा जुने