जर तुम्ही या 6 गोष्टींचा अवलंब केला तर,किचन राहील चमकदार !

आपल्या घरातील भांडी स्वच्छ आणि चमकदार असावीत असे प्रत्येक गृहिणीला वाटत असते . मात्र भांडे घासणे आणि धुणे हे कामही तितकेच अवघड आणि जिकरीचे आहे.


पण आता भांडे घासणे हे तितकेसे अवघड काम राहिले नाही. जर तुम्ही या 6 गोष्टींचा अवलंब केला तर तुम्हाला हे काम जिकरीचे वाटणार नाही आणि तुमची भांडी नेहमी चमकत राहतील.

जर तुम्ही जड भांड्यासोबत हलके भांडे जसे की क्रॉकरी धूत असाल तर आधी हलके भांडे धुऊन घ्यावे. चाकू चमचे यासारखी लहान भांडी सुद्धा आधी धुऊन घ्यावीत.

भांडे धुतल्यानंतर ते अशाप्रकारे ठेवावे कि त्यातले पाणी निथळून जाईल . नाहीतर त्यांतून वास येण्याचा संभव असतो. त्याचबरोबर भांडे रॅकमध्ये लावताना पुसून लावावीत ज्यामुळे त्यांच्यावर डाग पडणार नाहीत.

जर तुम्हाला जास्त तेलकट आणि जळालेली भांडी धुवायची असेल तर आधी त्यांना साबणाच्या पाण्यात भिजत घालावे जेणेकरून त्यांच्यातला सर्व तेलकटपणा निघून जाईल.

सगळे भांडे घासल्यानंतर त्यांना छोट्याकडून मोठ्या भांड्याकडे धूत जावे . असे केल्याने भांडे तर लवकर धुऊन होतात पण पाण्याची सुद्धा बचत होते.

भांडी धुतल्यानंतर एकात एक घालून ठेऊ नये. त्यांना वेगवेगळे करून पुसून रॅक मध्ये ठेऊन द्यावे. यासोबतच खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांत भांड्याची घासणी आणि साबण व्यवस्थित धुऊन घ्यावा.

भांडे धुतल्यानंतर वॉश बेसिन व्यवस्थित धुऊन घ्यावे ज्यामुळे तुमचे किचन तर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहील पण सोबतच तुमचे भांडेसुद्धा चमकदार राहतील.
थोडे नवीन जरा जुने