जेवणानंतर करू नका चुकुनही 'ह्या' 6 गोष्टी,नाहीतर...निरोगी शरीरासाठी प्रत्येक व्यक्ती स्वतःची काळजी घेत असतो. ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु जेवण केल्यानंतर कोणकोणती कामे करू नयेत याकडे कदाचित अनेकजण दुर्लक्ष करतात. 


तुमच्या मनात कधी हा विचार आला आहे का, जेवण झाल्यानंतर लगेच कोणती कामे करण्यापासून दूर राहावे. या कामांचे दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागू शकतात. 

ब-याच लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या गोष्टी करण्याची सवय असते, ज्या भावी आयुष्यात तब्येतीसाठी धोक्याचे कारण ठरू शकतात.

स्नान करू नये.


योग्य वेळी स्नान आणि जेवण करणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. परंतु काही लोकांची स्नान आणि जेवण करण्याची निश्चित वेळ नसते. जेवण केल्यानंतर लगेच स्नान करणे सर्वात जास्त हानिकारक मानले जाते. असे केल्यास पोटाच्या चारही बाजूंनी रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे पचनक्रिया मंद होते.
धूम्रपान करू नये.

सिगरेट पिणे शरिरासाठी धोक्याचेच मानले जाते पण ब-याच जणांना जेवणानंतर लगेचच सिगारेट पिण्याची सवय असते. अभ्यासु व्यक्तीच्या मते जेवनानंतर लगेच सिगरेट पिल्याने अन्नपचन व्यवस्थित होत नाही. काही जणाना जेवणानंतर सिगरेट अथवा तंबाखु खाण्याची तलब लागते पण जेवणानंतर लगेच अशा पदार्थाचे सेवन केल्यास गॅसेस आणि अ‍ॅसिडिटी सारखा त्रास होण्याची शक्यता असते.


जेवणानंतर लगेच फळे खाऊ नये.

जेवणानंतर लगेच फळांचे सेवन केल्यास खाल्लेले अन्न अन्ननलिकेत अडकुन बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण सेवन केलेले अन्न व्यवस्थितरित्या आपल्या शरिराच्या आत पोहचत नाही. या कारणामुळे आपली तब्येत खराब होवून आपण खालेले अन्न आतमध्येच सडु शकते. त्यासाठी जेवणाच्या एक तास आधी अथवा जेवनानंतर एका तासाने फ़ळाचे सेवन करणे आपल्या शरिरासाठी योग्य ठरू शकते. महत्वाचे म्हणजे रिकाम्यापोटी जर फळांचे सेवन केल्यास दिवसाची सुरूवात करण्यासाठी आवश्यक असणारी योग्य ती ऊर्जा शरीरास मिळण्यास मदतशीर ठरू शकते.
चहा टाळावा.

प्रमाणाच्या बाहेर चहाचे सेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. चहाच्या पानामध्ये अ‍ॅसिड मोठ्याप्रमाणात आढळून येत असल्यामुळे जेवणानंतर लगेच चहाचे सेवन करणे टाळावे. या अ‍ॅसिडमुळे अन्नात असलेल्या प्रोटिनला धोका निर्माण होऊन खाल्लेले अन्न पचवण्यासाठी त्रास होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जेवणानंतर चहाचे सेवन करायचे असल्यास साधारण एका तासानंतर शरिरासाठी योग्य ठरू शकते.


बेल्ट ढील्ला करू नये.

काही लोकांना क्षमतेपेक्षा जास्त जेवण करण्याची सवय असते आणि जेवल्यानंतर लगेच बेल्ट ढिल्ला करतात. असे करणे पोटासाठी चांगले मानले जात नाही. असे केल्याने शरीराची पचनक्रिया कमजोर होते आणि अन्न व्यवस्थित पचत नाही.


वॉक करू नये.

डॉक्टराच्या मते शरीरासाठी चालणे (वॉक) करणे लाभदायक आहे. पण, जेवणानंतर लगेचच चालणे पचनक्रियेत अडथळा निर्माण करू शकतो.साधारण जेवण झाल्यानंतर अर्ध्यातासाने चालणे शरीरास फायदेशीर ठरते. साधारण जेवल्यानंतर 20-30 मिनिटे चालल्यास पोटाच्या तक्रारी होण्याचा धोका नसतो.
थोडे नवीन जरा जुने