वेळीच व्हा सावध ही 7 लक्षणे असतील तर,नाहीतर व्हाल डायबेटीस चे शिकार ....


कोणताही आजार हा एका रात्रीत जन्मास येत नाही. किंवा त्याची लागनही एका क्षणात होत नाही. तर, कोणताही आजार हा काही काळ आगोदर काही लक्षणे दाखवतो. ही लक्षणे पाहून त्वरित वैद्यकीय उपचार घेतल्यास हे अजार दूर ठेवता येऊ शकतात. म्हणूनच जाणून घ्या मधुमेहाची लागण होण्यापूर्वी दिसणारी काही लक्षणे.
लक्षण 1 – जास्तीत जास्त पाणी प्यावसे वाटणे. वारंवार लगवीला लागने. जास्त पाणी पिऊनही वारंवार तहान लागणे. अशा वेळी तहान भागविण्यासाठी काही लोक ज्यूस, सोडा, चॉकलेट, दूध आदी गोष्टींचे सेवन करतात. पण, या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील साखर अधिकच वाढते. त्यामुळे होणारा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढतो.

लक्षण 2 – वजन घटने – वजन अधिक मोठ्या प्रमाणात वाढणे मधुमेहाला निमंत्रण देते. तसेच, प्रमाणापेक्षा कमी होणे हे सुध्दा मधुमेहाचेच लक्षण आहे. वजन घटण्याचे डॉक्टर दोन कारणे सांगतात. एक वारंवार वॉशरूमला जाणे आणि दुसरे म्हणजे शरीरातील वाढत्या कॅलरीजवर नियंत्रण ठेवता न येणे.

लक्षण 3 – अचानक अशक्तपना जाणवने. तीव्र भूक लागने ही सुद्धा मधुमेहाचीच लक्षणे आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तीला अचानकपणे अशक्तपणा येतो. रूग्णाच्या शरीरात जेव्हा हाई ब्लड शुगर असते तेव्हा शरीराला ग्लुकोजला मॅनेज करताना अडचण निर्माण होते.

लक्षण 4 – काम केल्यावर थकवा जाणवने ही अत्यंत साधी बाब आहे. मात्र, नियमितपणे अशक्तपणा जानवणे हा मधुमेहाचे लक्षण दाखवणारा प्रकार आहे. हे लक्षण दिसतात त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करा. टाईप-2 मधुमेहात रूग्णाच्या शरीरातील साखर काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाढते. या प्रकाराची लक्षणे हळुहळू पूढे येतात.

लक्षण 5 – चिडचिडेपणा आणि मूड खराब होण्याचे प्रकार वारंवार घडणे हेही मधुमेहाचे लक्षण आहे. शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाचे रूग्ण अधिक चिडचिडे बनतात. सततचे डिप्रेशन, घराबाहेरप पडण्याची ईच्छा न होणे, कामात लक्ष न लागने हेसुद्धा मधुमेहाचे लक्षण मानले जाते.

लक्षण 6 – नजर कमजोर होणे – मधुमेहाच्या सुरूवातीच्या काळात डोळ्यांना अचानक अधारी येणे. निट न दिसणे. अशी लक्षणे दिसतात. पण, मधुमेहात नजर कायमची अधू होत नाही. काही कालावधीनंतर रूग्णाची नजर स्थिर होते. त्याला निट दिसू लागते.

लक्षण 7 – शरीरावर झालेली कोणतीही जखम लवकर भरून न येणे. जखम चिघळत जाणे. जखमेत खाज होणे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घ्या.हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.
थोडे नवीन जरा जुने