अपयशापासून बचाव करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या "या" 7 गोष्टी लक्षात ठेवा !
1. चांगली स्मरणशक्ती आणि वाचलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान करावे. ध्यान करुन आपण मनावर नियंत्रण मिळवू शकतो आणि आपली एकाग्रता वाढू शकते.

2. जोपर्यंत जगत आहोत, तोपर्यंत शिकत राहावे. आपला अनुभव सर्वक्षेष्ठ शिक्षक आहे. आपल्या अनुभवांनी कोणताही व्यक्ती यशस्वी होऊ शकतो.

3. समाज तुमची प्रशंसा करो किंवा निंदा करो, लक्ष्य मिळो किंवा न मिळो, तुमचा मृत्यू आज होवो किंवा युगामध्ये, तुम्ही न्याय पथावरुन कधीच भ्रष्ट होऊ नये.

4. ज्यावेळी जो संकल्प केला, त्याच वेळी तो पुर्ण करावा, अन्यथा लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडून जाईल.

5. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.

6. एकावेळी एकच काम करावे आणि हे करताना पुर्ण आत्मापासून करावे आणि सर्व काही विसरुन जा. काम कितीही अवघड असले तरीही यश अवश्य मिळेल.

7. संघर्ष जेवढा मोठा असेल, यश तितकेच शानदार असेल.
थोडे नवीन जरा जुने