फुलकोबी खाण्याचे 'हे' 7 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?


फुलकोबी संपूर्ण भारतात भाजी स्वरुपात प्रचलित असून याचे पिक जवळपास सर्व राज्यांमध्ये घेतले जाते. फुलकोबीचे वनस्पतिक नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया बॉट्रिटीस असे आहे. 

फुलकोबीपासून विविध चविष्ट भाज्या केल्या जातात परंतु फार कमी लोकांना यामधील औषधी गुणांची माहिती असावी. आज आम्ही तुम्हाला फुलकोबीमधील औषधी गुणांची विशेष माहिती सांगत आहोत.

फुलकोबीमध्ये कॅल्शियम, फोस्फरस, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लोह तत्त्व तसेच व्हिटॅमिन ए, बी, सी, आयोडीन, आणि पोटॅशियम हे उपयोगी तत्त्व आढळून येतात. हे सर्व तत्त्व आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या विविध महत्त्वपूर्ण रसायनांची खान आहेत.

1 - फुलकोबीच्या पानांना कुटून रस तयार करून घ्या. या रसाने गुळणा केल्यास हिरड्यांमधून रक्त येणे बंद होते. कच्ची फुलकोबी चावून चावून खाल्ल्यास हिरड्यांवरील सूज कमी होते.

2 - फुलकोबीच्या पानांपासून तयार केलेल्या रसाचे दररोज सेवन केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होतो. कमीत कमी तीन महिने या रसाचे सेवन केल्यास शरीरातील इतर वेदना नष्ट होतात.


3. दररोज रिकाम्यापोटी एक कप कोबीच्या रसाचे सेवन केल्यास आतड्याचा आजार (कोलायटिस) आणि पोटदुखीचा त्रास कमी होतो.


4 - पाताळकोट येथील आदिवासी लोकांच्या माहितीनुसार, फुलकोबीच्या पानांच्या रसाचे सेवन मानेवरील सूज आणि गळ्याशी संबंधित इतर विकारांवरही उपयोगी आहे.


5 - कच्ची फुलकोबी स्वच्छ धुवून चावून चावून खाल्ल्यास रक्त शुद्ध होते तसेच विविध त्वचा रोग दूर होतात. लोह तत्त्व आणि प्रोटीनमुळे शाररीक शक्ती वाढवण्यात फुलकोबी उपयोगी ठरते.


6 - रात्री झोपण्यापूर्वी फुलकोबीचा रस पिल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. ज्या लोकांना लघवी करताना जळजळीचा त्रास होतो त्यांनी जास्त प्रमाणात फुलकोबी खावी.  


7 - फुलकोबी आणि गाजराचा रस समान मात्रेमध्ये एकत्र करून दररोज 1 ग्लास मिश्रणाचे सेवन केल्यास कावीळ झालेल्या रुग्णांना लाभ होईल.
थोडे नवीन जरा जुने