आहारात 'हे' पौष्टिक तत्त्वे आहेत का? जाणून घ्या...या 7 सोप्या पद्धतीस्वच्छ भाजीपाला विकत घेणे चांगले आहे. मात्र, त्यातील पोषक तत्त्वांसाठी ते योग्य प्रकारे शिजवणेही आवश्यक असते.

स्टीमच्या जागी हिरव्या पालेभाज्या ऑलिव्ह ऑइलमध्ये फ्राय केल्यास प्रतिजैविके मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटीन शोषून घेतात. पोषक तत्त्वांविषयीच्या अशाच काही आल्हाददायी स्वयंपाकाच्या बाबींविषयी जाणून घेऊया....

टोमॅटो गरम करून खाणे हृदयासाठी चांगले

टोमॅटो तव्यावर गरम करून खाल्ल्यास त्यातील पोषकतत्त्वे हृदयासाठी चांगली ठरतात. त्यामुळेच अन्य सॉसच्या तुलनेत टोमॅटो सॉस कधीही चांगले असते. यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. टोमॅटो कापून त्यास बेकिंग शीटवर ठेवा. नंतर त्यावर थोडेसे ऑलिव्ह ऑइल, मीठ काळे मिरे टाका. यास १५-२० मिनिटांपर्यंत ब्रॉइल होऊ द्या. याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायी ठरेल.

मोठे तुकडे खाल्ल्याने जास्त फायदा

फळेभाज्या कापताना मोठे तुकडे करावेत. बारीक तुकड्यांतून न्यूट्रियंट रिच ऑक्सिजन निघून जातो. मोठ्या तुकड्यांत जीवनसत्त्व दीर्घकाळ टिकून राहते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. फळ किंवा भाज्या कापल्यानंतर लगेच उपयोगात आणाव्यात. अन्यथा त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होऊ लागतात.


लसूण करेल कॅन्सरपासून संरक्षण

लसूण आहारात घेतल्याने शरीराला कर्करोगापासून दूर ठेवता येऊ शकते. लसणाची साल काढल्यानंतर त्यास बारीक घेऊन १०-१५ मिनिटे तसेच ठेवा नंतर वापरा. यामुळे लसणातील पोषक तत्त्वे नष्ट होणार नाहीत. हे सर्व करण्याइतका वेळ नसेल तर कच्चा लसूण थेट भाजीवरच टाका.


अधिक जीवनसत्त्वांसाठी चांगल्या मेदाचे प्रमाण वाढवा

फळ किंवा भाजीपाल्यांत ऑलिव्ह ऑइल, नट्स तसेच फॅटचे अन्य सकस स्रोत सामील केल्याने जीवनसत्त्व- अ, आणि कचे प्रमाण वाढवता येऊ शकते. या सर्व पोषक तत्त्वांनी दृष्टी, रोगप्रतिकारकशक्ती प्रखर बनेल. शिवाय, हृदयास आघात आणि शरीराला ऑस्टियोपोरोसिसपासून सुरक्षित ठेवता येऊ शकते.


लोह सत्त्वासाठी कास्ट-आयर्न पॅनचा उपयोग

आम्लधारी फळ किंवा भाजीपाला कास्ट-आयर्न पॅनमध्ये शिजवल्याने ऊर्जादायी लोह सत्त्वाचे प्रमाण दोन हजार टक्क्यांनी वाढते, असे टेक्सास टेक विद्यापीठाच्या संशोधनात आढळून आले आहे. सोलफूड हेल्दी टिफिन सर्व्हिसच्या आहारतज्ज्ञ साेनाली सबरवाल यांच्या मते, कास्ट-आयर्न पॅनमध्ये स्वयंपाक बनवणे नुकसानकारक नाही. पॅनमधून काही प्रमाणात लोह सत्त्व भाजीत मिसळून जाते. त्यामुळे चवीत काही फरक पडत नाही.


सलादवरील पानांमुळे वाढतील प्रतिजैविके

सलादमध्ये वनस्पतींची पाने टाकल्याने कर्करोगास लढा देणाऱ्या सत्त्वांत वाढ होईल. शिवाय, प्रतिजैविकांची संख्याही दुपटीने वाढेल. अद्रकाच्या सेवनानेही प्रतिजैविके वाढतात.


फळे आणि भाज्यांच्या साली अधिक पौष्टिक

सफरचंद, गाजरासारखी बहुतांश फळे आणि भाज्या साली काढून खाऊ नयेत. कारण या टरफलातच अधिक पोषक तत्त्वे तसेच फायबर असतात. टरफलांसह खाता येतील असे जैविक फळ विकत घ्यायला हरकत नाही. कीटकनाशके आणि घाण स्वच्छ करण्यासाठी फळ किंवा भाज्या स्वच्छ पाण्यानी धुऊन घ्या.
थोडे नवीन जरा जुने