जेवताना "या" 7 गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात....


आपल्या धर्म ग्रंथांमध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. प्राचीन काळी या नियमांचे पालन करणे अनिवार्य मानले जात होते, परंतु बदल्यात काळात हे नियमही बदलत गेले. जेवनाशी संबंधित काही नियम भविष्य पुराणात सांगण्यात आले आहेत. 

जेवण आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जेवणामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. काही लोक जेवण करताना असे काही काम करतात, जे शास्त्रामध्ये वर्ज्य आहेत. यामुळे अन्नाचा अपमान होतो. आज आम्ही तुम्हाला जेवणाशी संबंधित असेच काही खास नियम सांगत आहोत.1. एकाच ठिकाणी बसून पोटभर जेवण करावे. जेवण करताना वारंवार उठ-बस केल्याने धनाचा नाश होतो.

2. टाकून दिलेले अन्न पुन्हा खाऊ नये, यामुळे आयुष्य कमी होते. भुकेपेक्षा जास्त जेवू नये.

3. कोणालाही उष्टे जेवण खाऊ घालू नये आणि कोणाचेही उष्टे जेवण घेऊ नये.

4. खरकट्या तोंडाने कुठेही जाऊ नये. म्हणजेच काहीही खाल्ले तरी त्यानंतर थोडेसे पाणी अवश्य प्यावे.

5. जेवण शांत आणि आनंद मनाने करावे. जेवणात काही कमतरता असल्यास नावे ठेवू नये.

6. पूर्व दिशेला मुख करून जेवण केल्यास आयुष्य आणि पश्चिम दिशेला मुख करून जेवल्यास धनलाभ होतो.

7. उत्तर दिशेला मुख करून जेवण केल्यास सन्मान आणि दक्षिण दिशेला मुख करून जेवल्यास प्रसिद्धी मिळते.
थोडे नवीन जरा जुने