चुकूनही खाऊ नयेत रात्री "हे" 7 पदार्थ....



भरपेट जेवल्यानंतर झोप चांगली येतेच, ही धारणा चुकीची आहे. यामुळे अस्वस्थता वाढूही शकते. काही पदार्थ तर असे आहेत जे रात्री सेवन केल्यास झोप शांतपणे लागत नाही. काहींनी वजन वाढते. इतर आजारही जडू शकतात. जाणून घ्या याविषयी.


चिप्स स्नॅक्स : 

स्नॅक्स सेवन केल्यास तुम्ही रात्रभर झोपू शकणार नाहीत. हे हलके अन्न समजून अनेक लोक रात्री यावर भर देताना दिसतात.
का?- यात मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अतिरिक्त असते. त्यामुळे झोप उडण्याचीच शक्यता अधिक असते.

पास्ता : 

तुम्हाला भूक लागली असेल तर पास्ता चांगला आहार ठरू शकतो. मात्र, रात्री याचे सेवन टाळावे.
का?- रात्री पास्ता खाल्ल्याने वजन वाढते. कर्बोदकांमुळे चरबीचे प्रमाण झपाट्याने वाढते. रात्री हलका आहार घ्या. पास्ता टाळावा.


भाज्या : 

भाज्यांमध्ये पोषक घटक असतात हे वास्तव आहे. मात्र, झोपण्यापूर्वी याचे सेवन करणे टाळावे. आरोग्यासाठी हे अयोग्य ठरते.
का?- भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. याची पचण्याची गती फार मंद असते. त्यामुळे रात्रभर शांत झोप लागणे अशक्य.


पिझ्झा : 

फ्रिजमध्ये हा असतोच. मात्र, दुपारच्या जेवणात पिझ्झा घ्यावा. रात्री पिझ्झा खाऊ नये.
का?- पिझ्झाच्या टॉपिंगमधील घटकांनी वजन वाढते. यामुळे छातीत जळजळीची समस्याही उद््भवू शकते.


आइस्क्रीम: 

रात्रीच्या जेवणानंतर बहुतांश लोक आइस्क्रीम खातात. मात्र, आरोग्यासाठी हे योग्य नाही.
का?- आइस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्धांश शर्करा असते. पचन करण्याइतपत शरीराची हालचाल होत नाही.


मांसाहार : 

रात्री हे खाऊ नये. त्यामुळे गाढ झोप चाळवू शकते.
का?- शरीरातील नैसर्गिक क्रिया यामुळे प्रभावित होतात. याचे पचन सहजरीत्या होत नाही.


मद्य : 

काहीलो कांना वाटते की मद्य घेतल्यास येणाऱ्या नशेमुळे रात्री झोप चांगली लागते. मात्र, हा समज अगदी चुकीचा आहे.
का?- झोपेच्या नैसर्गिक प्रक्रियेत मद्यामुळे बाधा येते. मद्यामुळे झोपेचा खोळंबा होतो.
थोडे नवीन जरा जुने