उभा राहून पाणी पिणे आरोग्यासाठी आहे नुकसानकारक,हे आहेत 8 मोठे तोटे !


पाणी हे जीवन आहे. जीवनात राहण्यासाठी अन्नबरोबरच पाण्याचीही नितांत गरज असते. पाणी केवळ जगण्यासाठीच नव्हे तर आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर असते. पाणी पिल्याने केवळ आपली तहानच भागत नाही तर अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवते.

जिथे बसून पाणी पिणे हे आरोग्यासाठी हितकारक आहे. त्याविरुद्ध उभे राहून पाणी पिल्याने शरीराला अनेक अपाय सुद्धा होतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला उभे राहून पाणी पिल्याने होणारे नुकसान सांगणार आहोत.

उभे राहून पाणी पिल्याने होणारे नुकसान

प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर गौरव पारीख यांच्या म्हणण्यानुसार उभे राहून पाणी पिल्याने किडनी साठी धोकादायक ठरू शकते. कारण उभे राहून पाणी पिल्याने पाणी न गाळताच किडणीतून निघुन जाते. ज्याच्यामुळे किडणीमध्ये संक्रमण होण्याची शक्यता वाढते.

उभे राहून पाणी पिल्याने सगळ्यात जास्त नुकसान आपल्या हृदयाला होण्याचा संभव असतो. कारण उभे राहून पाणी पिल्यानेखाल्लेले जेवण चांगल्या प्रकारे पचन होत नाही . अशात शरीरामध्ये कॉलेस्ट्रोल चे प्रमाण वाढून हृदयविकाराचे कारण होऊ शकते.

जॉईंट पेन आणि इतर अनेक समस्या होण्यासाठी सुद्धा जास्तकरून हेच कारण असते. उभे राहून पाणी पिल्याने शरीरातील अनेक प्रकारच्या लिक्विड पदार्थांचा समतोल बिघडतो. ज्यामुळे शरीरातील जॉइन्टच्या ठिकाणी पुरेसे पाणी पुरवठा होत नाही. यामुळे जॉईंट पेन सारख्या समस्या उत्पन्न होतात.

उभे राहून पाणी पिल्याने अल्सर होण्याची शक्यता बळावते. उभे राहून पाणी पिल्याने शरीरातल्या एसोफेग्स नळीच्या खालच्या बाजूस वाईट परिणाम होतात. ज्यामुळे अल्सर सारखे आजार होण्याची शक्यता वाढते. 

उभे राहून पाणी पिल्याने अन्न व्यवस्थितरित्या पचले जात नाही. ज्यामुळे इन डायजेशन सारख्या समस्या उद्भवतात.

त्याचबरोबर अनेक लोकांना कब्ज सारख्या गंभीर दुखण्याला सामोरे जावे लागते. उभे राहून पाणी पिल्याने अन्न व्यवस्थितरित्या पचले जात नाही. परिणामी कब्जची समस्या निर्माण होते. 

तुमच्या माहितीसाठी हे सांगणे गरजेचे आहे की उभे राहून पाणी पिल्याने शरीरात गरजेपेक्षा जास्त ऍसिड तयार होते जास्तीचे ऍसिड एसीडीटी चे कारण बनते.
थोडे नवीन जरा जुने