दात घासण्याव्यतिरिक्त टूथपेस्टचे 'हे' 8 उपयोग तुम्हाला माहित आहे का ?


दररोज आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्या दिनचर्येशी संबंधित काही कार्य अवश्य करतो. दात घासणे (ब्रश करणे) त्यामधीलच एक महत्वाचे कार्य आहे. दात स्वच्छ दिसण्यासाठी आणि मजबूत राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकरच्या टूथपेस्टचा उपयोग करतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? टूथपेस्टचा उपयोग दात घासण्यासाठी तसेच इतर कामांमध्येही केला जाऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला टूथपेस्टशी संबधित काही खास उपाय सांगत आहोत, जे तुम्हाला माहिती नसावेत.
 जाणून घ्या टूथपेस्टचे खास उपाय...

चेहर्‍यावर पिंपल्स, काळे डाग असतील तर टूथपेस्ट यासाठी योग्य उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी पिंपल्सवर टूथपेस्ट लावून झोपा. रात्रीतून टूथपेस्ट पिंपल्समधील तेल शोषून घेईल आणि सकाळी पिंपल्स जीरलेले असेल. ज्यांना टूथपेस्टची अ‍ॅलर्जी असेल त्यांनी हा उपाय करू नये.लहान मुलाच्या दुधाची बाटली स्वच्छ नसेल तर बाळ आजारी पडण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. यामुळे दुधाची बाटली चांगल्या प्रकारे स्वच्छ करून स्मेल फ्री बनवण्यासाठी बाटली स्वच्छ करण्याच्या ब्रशवर थोडे टूथपेस्ट लावून बाटली धुवून घ्यावी.

कपड्यावर टोमॅटो सॉस किंवा शाईचा डाग पडला असेल तर थोडावेळ टूथपेस्ट डागावर लावून ठेवा. कपड्यावरील डाग निघून जातील. घरातील भिंती मुलांनी रंग लावून खराब केल्या असतील तर टूथपेस्ट लावून भिंत स्वच्छ करू शकता.


जर शरीरला कुठे पोळले असेल तर त्याठिकाणी टूथपेस्ट लावल्यास आराम मिळेल तसेच पोळल्याचा डागही नष्ट होईल. एखादा किडा चावला असेल तर टूथपेस्ट लावल्यास आराम मिळेल.


हाताचा घामाने वास येत असेल तर हातावर थोडे टूथपेस्ट लावून हात स्वच्छ धुवून घ्या. हाताचा वास जाईल तसेच हातावरील किटाणू नष्ट होतील.

दागिन्यांची चमक फिकी पडली असेल तर दागिन्यांवर टूथपेस्ट लावून टूथब्रशने स्वच्छ केल्यास दागिने चमकतील.


वारंवार नेलपॉलिश लावल्यामुळे नखांची चमक फिकी पडली असेल तर नखाने नेलपॉलिश काढून टाकावी आणि त्यानंतर थोडावेळ नखांवर टूथपेस्ट लावून मालिश करावी. नखं चमकदार होतील.
थोडे नवीन जरा जुने