व्यर्थ मानले जाणारे हे रोप,पुरुषांसाठी आहे खूपच फायदेशीर, जाणून घ्या 'हे' 8 फायदे !

लाजाळूच्या झाडाला कोणी स्पर्श केला तर त्याची पाने पाने मिटतात. आपल्या या गुणधर्मामुळे या वनस्पतीला मराठीत लाजरी, संकोचनी; हिंदीमध्ये लाजवती, लज्जावंती; गुजरातीमध्ये लजमणी, रिशामणी; संस्कृतमध्ये लज्‍जिका, लज्‍जालु असे म्हणतात. 

संपूर्ण भारतामध्ये आढळून येणारी ही वनस्पती औषधी गुणांनी भरलेली आहे. अनेक आदिवासी भागांमध्ये या वनस्पतीचा रोगांवर उपचार करण्यासाठी उपयोग केला जातो. आज आम्ही तुम्हाला या वनस्पतीशी संबंधित सर्व आदिवासी उपायांची माहिती देत आहोत...

1. लाजाळूच्या मुळाचे आणि बियांचे चूर्ण दुधातून घेल्यास पुरुषांमधील वीर्याच्या कमतरतेची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. लाजाळूच्या बियांचे 4 ग्रॅम चूर्ण दररोज रात्री एक ग्लासभर दुधातून घेण्याचा सल्ला देतात. एक महिनाभर हा उपाय केल्यास सकारत्मक बदल दिसून येतील.

2.लाजाळूचे 100 ग्रॅम पाने 300 मिली पाण्यामध्ये उकळून हा काढा डायबिटीजच्या रुग्णाला दिल्यास आराम मिळेल.

लाजाळूचे इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

3. लाजाळूच्या बियांचे चूर्ण (3 ग्रॅम) दुधासोबत मिसळून दररोज रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते.

4. लाजाळूच्या झाडाला आदिवासी बहुगुणी औषध मानतात. यांच्यानुसार हे रोपटे जखम लवकर भरून काढण्यात सक्षम आहे. या रोपाच्या मुळाचे 2 ग्रॅम चूर्ण दिवसातून तीन वेळेस कोमट पाण्यातून घेतल्यास अंतर्गत जखम लवकर ठीक होऊ शकते.


5. आधुनिक वैज्ञानिक शोधानुसार हाडांचे तुटणे आणि मांसपेशीमधील अंतर्गत जखमेच्या उपचारामध्ये लाजाळू रोपाचे मूळ महत्त्वाची भूमिका बजावते. जखम ठीक करण्यात या रोपाचे मूळ सक्रियतेने कार्य करते.

6. लाजाळूचे पाने पाण्यामध्ये बारीक करून हे मिश्रण नाभीच्या खाली लावल्यास लाघवी जास्त होणे बंद होते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार या पानांचा 4 चमचे रस दिवसातून एकवेळेस घेतल्यास लाभ होतो.


7.लाजाळूचे मूळ आणि पानांची पावडर दुधामध्ये मिसळून घेतल्यास मुळव्याध आणि भगंदर रोग ठीक होतात. काही आदिवासी लाजाळूच्या पानांचा रस मुळव्याधीच्या जखमेवर लावण्याचा सल्ला देतात. यांच्या मते हा रस जखम कोरडी करण्यास मदत करतो.

8. मध्यप्रदेशच्या विविध भागातील आदिवासी लाजाळूच्या पानांची एक चमचा पावडर लोण्यामध्ये मिसळून भगंदर किंवा मुळव्याधीच्या जखमेवर दिवसातून तीन वेळेस लावण्याचा सल्ला देतात.
थोडे नवीन जरा जुने