तुम्हाला माहित आहेत का ? कोथिंबीर आणि धने खाण्याचे हे 8 आश्चर्यचकित करणारे फायदे,जाणून घ्या !


कोथिंबिरीच्या रोपाला आलेले सुवासिक फळ धने, हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे. मसाला स्वरुपात आणि पदार्थाची चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. 

कोथिबिरची हिरवी पानं किंवा याचे वाळलेले बी, यांचा वापर घराघरात केला जातो. आधुनिक विज्ञानाने धने आणि कोथिंबिरीचे विविध औषधी गुण प्रमाणित केले आहेत. आज आम्ही तुम्हाला याच्यांशी संबंधित पारंपारिक ज्ञानाच्या गोष्टी सांगत आहोत.

हिरव्या ताज्या कोथिंबिरीची जवळपास 20 ग्रॅम पानं आणि त्यामध्ये चिमुटभर कापूर मिसळून बारीक करून रस गाळून घ्या. या रसाचे दोन थेंब नाकात टाकल्याने तसेच या रसाने माथ्यावर हलक्या हताने मालिश केल्यास नाकातून निघणारे रक्त (घोळणा फुटणे) थांबेल.

कोथिंबीरीचे पानं बारीक करून पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या. गाळलेल्या पाण्याचे काही थेंब डोळ्यामध्ये टाकल्यास डोळ्यातून पाणी येण्याची समस्या दूर होईल. 

तसेच कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन सी, ए, अँटीऑक्सीडेंट आणि फॉस्फरससारखे तत्व आढळून येतात. यामुळे कमजोर दृष्टीसाठी कोथिंबीर एक उत्तम औषध आहे.


धने महिलांमधील मासिक पाळीतील समस्या दूर करण्यात सक्षम आहेत. मासिक पाळीतील काळात जास्त त्रास होत असेल तर अर्धा लिटर पाण्यामध्ये 6 ग्रॅम धन्याची पावडर टाकून एकजीव करून घ्या, त्यानंतर यामध्ये साखर टाकून या मिश्रणाचे सेवन केल्यास लाभ होईल.

धन्याला मधुमेहनाही मानेल जाते. याच्या सेवनाने रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित राहते.


कोथिंबीरीचे पानं बारीक करून याच्या 1 चमचा प्रमाणात चिमुटभर हळद मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर दिवसातून कमीतकमी दोन वेळेस लावा. या उपायाने चेहऱ्यावरील मुरुमामंची समस्या दूर होते.

बडीशेप, थोडीशी खडीसाखर, धने पावडर एकसमान प्रमाणात घेऊन याचे चूर्ण तयार करून 6-6 ग्रॅम दररोज जेवण केल्यानंतर खाल्ल्यास हात-पायांची डोळ्यांची जळजळ, एसिडिटी, डोकेदुखी दूर होते.


कोथिंबीरीच्या (धने) सुगंधित तेलामध्ये सिटरोनेलोल तत्व आढळून येते, जे उत्तम प्रकारचे अँसेप्टिक आहे. यामुळे तोंड आल्यास किंवा तोंडामध्ये जखम झाल्यास हे तेल फायदेशीर ठरते.

राजस्थानमधील विविध भागात कोथिंबीरचा चहा पिला जातो. यामुळे आरोग्य सुधारते. जवळपास दोन कप पाण्यामध्ये जिरे, धने, चहा पत्ती आणि थोड्या प्रमाणात बडीशेप टाकून 2 मिनिट हे मिश्रण उकळून त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर आणि अद्रक टाकले जाते. गळ्याचे आजार, अपचन आणि गॅसचा त्रास असलेल्या लोकांनी या चहाचे सेवन केल्यास लाभ होईल.
थोडे नवीन जरा जुने