धक्कादायक ! ATM मध्ये असतात पब्लिक टॉयलेट इतके विषाणू...

प्लॅस्टिक मनी च्या या जमान्यात एटीम मशीन हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. ATM वापरणाऱ्या लोकांची संख्या कोटींच्या घरात आहे. 


अशा वेळी जर तुम्हाला कोणी म्हटले की ATM वापरल्याने तुम्ही गंभीर आजारांना बळी पडू शकता तर तुमचा विश्वास बसणार नाही पण असं होऊ शकत. एका रिसर्च मध्ये ही गोष्ट समोर आली आहे.

अशाच आणखी एका रिसर्च मध्ये ही गोष्ट समोर आली होती की तुमच्या मोबाईल स्क्रीन वर तितकेच किटाणू असतात जितके एका टॉयलेट सीट वर असतात. 

तेव्हापासून लोक मोबाईलच्या वापराबाबत जागरूक झाले आहेत. एका नव्या रिसर्चनुसार ही गोष्ट समोर आली आहे की एटीम मशीन मध्ये टॉयलेटपेक्षा जास्त विषाणू असतात.

ब्रिटनच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. ब्रिटनच्या संशोधकांनी एटीम मशीन आणि पब्लिक टॉयलेट चे स्वैब्स घेऊन त्यांची तुलना केली. दोन्ही स्वैबसमध्ये डायरिया सारखा खतरनाक आजार पसरवणारे विषाणू आढळून आले.

मायक्रोबियॉलॉजिस्टिक रिचर्ड हॅसिंग यांनी सांगितले की या निष्कर्षाने तेसुद्धा चकित झाले. एटीम मशीनवर सुद्धा तेच विषाणू होते जे पब्लिक टॉयलेट मध्ये होते.
थोडे नवीन जरा जुने