BEAUTY TIPS : टोमॅटोचा हा USE, केल्यास केस दाट / चमकदार / मुलायम होतील !


टोमॅटो ज्यूस केसांना लावल्यानं केसांची रचना मुलायम होते आणि चमकदेखील वाढते.

टोमॅटो ज्यूस लावल्यानं पीएच पातळी संतुलित राहते, ज्यामुळे केस दाट होतात.

टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन 'ए' आणि व्हिटॅमिन 'सी' आढळते, ज्यामुळे स्कॅल्पला मजबुती मिळते. टोमॅटो ज्यूस लावल्यानं केस मजबूत होतात आणि दोन तोंडी केसांपासूनदेखील मुक्ती मिळते.

आपले केस रुक्ष झाले असल्यास किंवा आपण डँड्रफमुळे परेशान असाल, तर टोमॅटोच्या ज्यूसमध्ये मध मिसळून केसांवर लावा. अध्र्या तासानं केस धुवा.

 टाळूवर खाज सुटत असल्यास ३ टोमॅटोच्या पल्पमध्ये २ चमचे लिंबाचा रस मिसळून टाळूवर लावा. अध्र्या तासानं गार पाण्यानं केस धुवा. यावेळी शाम्पू वापरण्याची गरज नाही.

दाट केसांसाठी २ चमचे एरंडेल तेल आणि १ टोमॅटोची प्युरी मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट कोमट करून घ्या. ही पेस्ट टाळूवर लावा. स्कॅल्पवर मालीश करा. नंतर २ तास असेच राहू द्या आणि मग केस धुवा.

टोमॅटोत ॲण्टिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. टोमॅटोचं सेवन करणं त्वचेसाठी फायदेशीर असतं. त्याचप्रकारे केसांना टोमॅटो लावल्यानं रूक्ष केसांमध्येदेखील चमक येऊन जाते.
थोडे नवीन जरा जुने