कॅन्सरला दुर ठेवण्यासाठी रोज खा दोन टोमॅट, 'हे' आहेत अजूनही आश्चर्यकारक फायदे !टोमॅटोकडे केवळ भाजी स्वरूपातच पाहू नका, यामध्ये विविध प्रकारचे औषधी गुणही आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट आणि विशेषतः लायकोपीन आढळून येते. लायकोपीन तत्वामुळे टोमॅटोचा रंग लाल होतो. हे प्रोस्टेट कॅन्सर आणि हृदयाचे आजार दूर ठेवण्यास मदत करते.

टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, वसा इ पौष्टिक तत्व आढळतात. अशा पौष्टिक तत्वांनी भरलेल्या टोमॅटोचे सेवन प्रत्येक ऋतूमध्ये फायदेशीर ठरते. तुम्ही हे भाजी किंवा सलाड स्वरुपात खाऊ शकता, हे तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. येथे जाणून घ्या, टोमॅटो खाण्याचे खास फायदे...

1. जेवण करण्यापूर्वी दोन टोमॅटो कापून त्यावर काळेमीठ, बारीक केलेली काळी मिरी, धने पावडर टाकून खावे. यामुळे चेहऱ्यावर लाल येईल तसेच पौरुष शक्ती वाढेल. पोटात जंत झाले असल्यास टोमॅटोवर बारीक केलेली काळीमिरी टाकून खाल्ल्यास लाभ होईल. डायबिटीजच्या रुग्णांसाठीसुद्धा टोमॅटो फायदेशीर ठरते. टोमॅटो खाणाऱ्या लोकांना कॅन्सर होत नाही. दाम्याचा त्रास असलेल्या लोकांनी वर्षभर टोमॅटोचे सेवन करावे. याच्या नियमित सेवनाने श्वसन नलिकेवरील सूज कमी होते.

2. टोमॅटोचे नियमितपणे सेवन केल्यास पोट साफ राहते. टोमॅटो एवढे पोषक असतात की, सकाळी नाष्ट्यामध्ये घेतलेले केवळ दोन टोमॅटो संपूर्ण जेवणासमान असतात आणि सर्वात महत्त्वाच्या फायदा म्हणजे यामुळे तुमचे वजनही वाढत नाही. या व्यतिरिक्त टोमॅटोचे सेवन अनेक छोट्या-छोट्या व्याधींपासून आपले रक्षण करते.


3. टोमॅटोच्या गरामध्ये लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळ होतो. टोमॅटो चेहऱ्यावरील सुरकुत्यांना कमी करून रोम छिद्र वाढवण्यास मदत करतो. या व्यतिरिक्त तुम्ही टोमॅटो आणि मधाचे मिश्रण असलेल्या फेस पॅक वापरू शकता. याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा वाढते.


4. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात आढळून येते. हे डोळ्यांसाठी खूप लाभदायक आहे. यामुळे पचनशक्ती वाढते. याचे नियमित सेवन केल्यास लिव्हर योग्य पद्धतीने काम करते आणि गॅसची समस्याही दूर होते. ज्या लोकांना वजन कमी कण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी टोमॅटो एक वरदान आहे. एका मध्यम आकाराच्या टोमॅटोमध्ये केवळ 12 कॅलरीज असतात.
थोडे नवीन जरा जुने