चेहरा तजेलेदार दिसण्यासाठी टोमॅटोचा करा अशा प्रकारे वापर...जाणून घ्या 'ह्या' फळांचे खास गुण !


चेहरा तजेलेदार दिसण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारचे उपाय करत असतात. वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांचा चेह-यावर प्रयोग करून बघितला जातो. या सौंदर्यप्रसाधनाने चेहरा कधी चेह-यावर रिअ‍ॅक्शन येतात. त्यामुळे त्वचा आहे त्यापेक्षा जास्त रुक्ष दिसू लागते. 

म्हणून अशावेळी घरगुती उपाय करणे कधीही चांगले आणि फायदेशीर असते. घरगुती उपयांनी चेह-याची चमक तर वाढतेच मात्र ती चमक कायम टिकूनही राहते.

चेह-यावर पिंपल्स किंवा काळे डाग असल्यास तसेच वाढत्या वयामुळे चेह-यावर दिसणा-या सुरकुत्या या सर्व समस्यांवर घरगुती उपाय चांगले काम करते. चला आज आम्ही तुम्हाला चेह-यावरील डाग, पिंपल्ससारख्या समस्यांपासून मुक्त करण्यासाठी उपाय सांगणार आहोत.

टोमॅटोचा रस काढून त्यामध्ये थोडे मध टाकून एकत्र करा. या मिश्रणाने हलक्या हाताने चेह-यावर मसाज करा. चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्या. नियमीत रुपात या उपायाचा वापर केल्यास लवकरच तुमचा चेहरा तजेलेदार होईल.


सफरचंदाची पेस्ट बनवून त्यामध्ये काही प्रमाणात दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेह-यावर लावू काहीवेळाने धुवून घ्या. आठवड्यातून कमीत-कमी चार वेळा असे केल्यास खूप चांगला आराम मिळेल.
खाण्याचे एक पान बारिक करून त्यामध्ये एक चमचा नारळाचे तेल टाका. ही पेस्ट चेह-यावर लावा. कोणत्याही भागावर काळे डाग असल्यास त्या ठिकाणी लावा नंतर चेहरा धुवून घ्या. असे आठवड्यातून कमीत-कमी दोन ते तीन वेळा करा. तीन महिन्यांमध्ये काळे डाग नाहिसे होतील.

एक बटाटा बारिक करून त्यामध्ये 2-3 चमचे दूध घाला. त्याची पेस्ट बनवून दररोज संध्याकाळी काहीवेळ चेह-यावरील काळ्या डागांवर लावा. काही दिवसांत चेह-यावरील काळ्या डागांची समस्या दूर होईल.


दररोज ग्लिसरीन आणि लिंबूचा रस समान प्रमाणात चेह-यावरीव काळ्या डागांवर लावल्यास चांगला फायदा होतो.

हर्बल वैद्यच्या माहितीनुसार, 1/2 कप पत्ता कोबीचा रस तयार करा. त्यामध्ये 1/2 चमचे दही आणि 1 चमचा मध घालून चेह-यावर लावा. काहीवेळानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. असे केल्यास त्वचा टवटवीत होते आणि सुरकुत्या दिसत नाहीत.


रात्री झोपण्यापूर्वी संत्र्याच्या 2 चमचे रसात 2 चमचे मध टाकून मिश्रण बनवा. ह मिश्रण चेह-यावर 20 मिनीटांपर्यंत लावून ठेवा. त्यानंतर दूधाने चेहरा स्वच्छ करा. असे रोज केल्यास लवकरच सकारात्मक परिणाम जाणवेल.

एक बटाटा बरिक किसून घ्या. त्यामध्ये 2/3 चमचे दूध घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेह-यावर लावल्यास पिंपलिसपासून सुटका मिळेल.

 दररोज ग्लिसरीन आणि लिंबूच समान प्रमाणात एकत्र करून चेह-यावरील काळ्या डागांवर लावल्यास काळे डाग नाहीसे होतील.
थोडे नवीन जरा जुने